स्त्री उद्धारक क्रांतीजोती सावित्रीआई फुले यांच्या 188 व्या जयंती निमित्त अभिवादन

बाळकडू वृतसेवा | लातूर जिल्हा

लातूर : राष्ट्रमाता, प्रथम शिक्षिका, मुख्याध्यापिका, स्त्री उद्धारक क्रांतीजोती सावित्रीआई फुले यांच्या 188 व्या जयंतीनिमित्त सामाजिक, राजकीय, वैद्यकीय, शैक्षणीक, साहीत्यीक, पत्रकारीता, आर्थिक, कायदेविषयक, प्रशासकीय अशा विविध क्षेत्रात कार्य करत असलेल्या सावित्रीआई च्या लेकींच्या व फुलेप्रेमींच्या शुभहस्ते क्रांतीजोती सावित्रीआई फुले यांच्या तेलचित्रास पुष्पहार अर्पण करून  क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या पुर्णाकृती पुतळा परीसर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क,  मेन रोड लातूर येथे अभिवादन करण्यात आले.
महात्मा फुले ब्रिगेडच्या पुढाकारातून अभिवादन करून जयंती साजरी करण्यात आली. यावेळी बाेलताना महात्मा फुले ब्रिगेड चे प्रदेशाध्यक्ष दत्ता माळी (चांबारगे) यांनी क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या शेजारीच सावित्रीआई फुले यांचा पुर्णाकृती पुतळा उभारावा म्हणजे फुलेदांम्पत्य लातूर शहराचे वैभव वाढवतील असे प्रतिपादन केले. यावेळीं आदिवासी नेते रामराजे आत्राम यांनीही आपल्या वाणीतून फुलेदांम्पत्याच्या जीवनावर प्रकाश टाकला .यावेळी अँड.मधुकर कांबळे ,श्री . प्रदिप कांबळे   उपस्थित हाेते. यावेळी उपस्थित फुलेप्रेमींनी घाेषणांनी परीसर दणाणुन सोडला होता. या कार्यक्रम यशस्वीतेसाठी गणेश बुरबुरे, दत्ता बिराजदार, पिरपाशा गिड्डे, दत्ता म्हेत्रे, महेश म्हेत्रे, सुरज भोजणे, बालाजी माळी व ऋषिकेश क्षीरसागर यांनी परीश्रम घेतले.

दत्ता माळी ९०२१४७९९७५