बायपास मार्गे धावत असलेल्या १३५ एस.टी. बसला शिवसेना व सामाजिक कार्यकर्त्यांच्या पाठपुराव्यामुळे बाळापुरात थांबा

    (तालूका प्रतिनिधी)
     बाळापूर:- मागील अनेक दिवसापासून खामगाव व अकोल्यावरून  बळापूरचे प्रवाशी न घेता सरळ बायपास  मार्गे धावत असलेल्या st बसेसमुळे बाळापूर शहरातील  विदयार्थी कर्मचारी व कामानिमित्त बाहेरगावी जाणाऱ्या तसेच ग्रामीण भागाच्या प्रवाश्यांना अनेक समस्यांचं सामना करावा लागत होता ही बाब शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या व सामाजिक कार्यकर्त्यांच्या समोर आल्यानंतर त्यांनी परिवहनमंत्री ना दिवाकरजी रावते साहेब यांच्यासह अकोला विभाग नियंत्रक,वाहतूक नियंत्रक व संबधित अधिकार्यसोबत चर्चा करून सदर बाब त्यांच्या लक्षात आणून दिली चर्चेदरम्यान लवकरच बायपास मार्गे धावत असलेल्या st बसेस बाळापूर मार्गे वळविण्यात येतील असे आश्वासन संबधित अधिकाऱ्यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना दिले होते
   त्या अनुरूप आज बाळापूर शहरातून धावणाऱ्या 135 गाड्यांची यादी प्राप्त झाली असून  या यादीमधील कोणत्याही गाडीच्या वाहकाने किंवा चालकाने बाळापूर येण्यास मज्जाव केला तर वाहक नियंत्रक जवळ तक्रार करावी गाडी बाळापुरात आणण्यास मदत केली जाईल
शिवसेना व सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेल्या कामगिरीमुळे विदयार्थी,कर्मचारी व दैनंदिन प्रवासात असलेल्या प्रवाश्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्याबद्दल कृतज्ञाता व्यक्त करत आहेत
       आनंदकुमार बहुरूपे
बाळापूर तालूका प्रतिनिधी बाळकडू
9922643346
Attachments area