देवळा तालुक्यातील ऊमराणा जिल्हा परिषद गटात शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थांचा संवाद दौरा संपन्न.

राजेश पवार (देवळा तालुका प्रतिनिधी)=

आगामी काळात दुष्काळावर मात करण्यासाठी गावपातळीवरील गावकर्यांच्या समस्या जाणुन घेऊन त्यांवर उपाययोजना व मदत करण्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष संवाद साधुन पक्ष बांधणी च्या कामास बळकटी मिळण्याच्या उद्देशाने मानणीय शिवसेना पक्ष  प्रमुख श्री उध्दवजी ठाकरे यांच्या आदेशाने मानणीय शिवसेना नेते खासदार श्री संजयजी राऊत यांच्या सुचनेनुसार नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख श्री भाऊसाहेब चौधरी.चांदवड देवळा विधानसभा संपर्क प्रमुख श्री ललित शाईवाले यांच्या मार्गदर्शनाखाली देवळा तालुक्यातील ऊमराणा जि. प.गटात  शिवसेना पदाधिकारी स्थानिक कार्यकर्ते व ग्रामस्थांचा दोन दिवसांचा संवाद दौरा संपन्न झाला. (p)ऊमराणा जि.प.गटातील एकुण 14 गावात प्रत्यक्ष जाऊन ग्रामस्थांच्या गाठीभेटी घेऊन दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थ व शेतकरी वर्गाला भेडसावणार्या पाणी टंचाई. चारा टंचाई. सिंचनाचे अर्धवट प्रकल्प.वीजेचे अवास्तव बिले.शेतकरी कर्जमाफी. एस.टी.बस संदर्भात समस्या. यांवर संवाद साधुन निवारण करण्याच्या दृष्टीने कार्यवाहीस सुरुवात करण्यात आली. (p)संवाद दौर्यात नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख श्री भाऊसाहेब चौधरी. चांदवड देवळा विधानसभा संपर्क प्रमुख श्री ललित शाईवाले. महिला आघाडी जिल्हा प्रमुख भारतीताई जाधव. उपजिल्हाप्रमुख देवा वाघ.देवळा तालुका प्रमुख श्री सुनिल पवार. महिला शिवसैनिक वैशाली शिंदे. रमेश देवरे.भाऊसाहेब देवरे.ऊपतालुका प्रमुख भरत देवरे.तालुका सहसंघटक भाऊसाहेब चव्हाण. गण प्रमुख भाऊसाहेब पवार.ऊमराणा शहर प्रमुख दिपक देवरे.बंटी देवरे.राहुल शिंदे. बाळासाहेब देवरे.भगवान देवरे.आदि.शिवसैनिक. पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह गावोगावी स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थीत होते. ====(राजेश पवार देवळा तालुका प्रतिनिधी बाळकडु दैनिक.)