जेष्ठ पत्रकार धों.ज.गुरव, शांता वाणी व  विजय पाठक जीवन गौरव पुरस्काराने सन्मानीत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा स्तुत्य उपक्रम – मान्यवरांनी केले कौतुक 

जळगाव, प्रतिनिधी – पत्रकारिता क्षेत्रात प्रभावी व भरीव कामगिरी केलेले जेष्ठ पत्रकार धो.ज.गुरव, सौ.शांता वाणी, विजय पाठक यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच जिल्ह्यातील निर्भीड व झुंझार १९ पत्रकारांना उत्कृष्ट पत्रकार व १ उत्कृष्ठ लेखन पुरस्कार महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे आज दिनांक ६ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवनात आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते सन्मानतीत करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकमतचे संपादक मिलिंद कुलकर्णी हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपिठावर आ. राजूमामा भोळे, विधान परिषदेचे आ. चंदूभाई पटेल, मविप्र.चे मानद सचिव निलेश भोईटे, महापौर सौ.सिमाताई भोळे, इम्पेरियल इंटरनॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूलचे  चेअरमन श्री.नरेश चौधरी, संपादक व.ता.पाटील, राजेश यावलकर, अंजली बाविस्कर, प्राचार्य भगवान नन्नवरे, किशोर रायसाकडा, इम्रान शेख, जिल्हाध्यक्ष प्रविण सपकाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरवातीला आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला मान्यवंरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केला व दीपप्रज्वलन करून कार्क्रमाची सुरवात झाली.
पत्रकारिता करतांना प्रत्येकाने नविन तंत्रज्ञान अंगिकृत करून पत्रकारीता केली पाहिजे हि काळाची गरज आहे. आजच्या युगात पेपर लेस कार्यालयीन कामकाज होत असल्याने तंत्रज्ञान अवगत करणे प्रत्येकाचे नैतिक कतृत्व असून भविष्यात पत्रकारिता करतांना आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे पत्रकारांना गरजेचे आहे असे प्रतिपादन मिलिंद कुलकर्णी यांनी केले.
आ. राजूमामा भोळे म्हणाले की, पत्रकारांनी सकारात्मक पत्रकारीता करावी. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे प्रथमच जिल्ह्यात जेष्ठ पत्रकार व संपादक यांचा जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येत असल्याचे नमुद करून जिल्हाध्यक्ष प्रविण सपकाळे यांच्या कार्याचा गौरव करून आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची प्रतिमा भेट दिली.
इम्पेरियल इंटरनॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूलचे  चेअरमन श्री.नरेश चौधरी बोलतांना म्हणाले की, आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर अवघ्या वयाच्या 20 व्या वर्षी दर्पण वृत्तपत्राचे संपादक होते. पत्रकारिता करतांना संघर्ष हा असतोच त्याला सामोरे जाऊन आपले उद्ीष्ट साध्य करणार्‍यांनाच उपलब्धी प्राप्‍त होते.
कार्यक्रमाच्या सुरूवातीस जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने यावेळी आरोग्य विभागाचे अतिरिक्त जिल्हा आरोग्यअधिकारी डॉ.प्रणोद पांढरे,डॉ.राजेश सोनावणे ,डॉ.फिरोज शेख,डॉ.संदीप चौधरी,डॉ.शैलेंद्र चव्हाण,डॉ.राहुल निकम व त्यांच्या टीम ने पत्रकार बांधवांची १२ प्रकारची आरोग्य तपासणी करून घेतली.  तसेच  डॉ.उल्हास पाटील मेडिकल कॉलेज च्या सौजन्याने रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते यावेळी पत्रकार बांधवानी भरगोस प्रतिसाद देत रक्तदान केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्राचीन सपकाळे यांनी केले.प्रास्ताविक करताना ते म्हणाले कि सर्वाधिक सभासद असणारी महाराषटातील नावलौकिक असलेली महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ आहे.पत्रकारांच्या न्याय हक्क साठी लढत राहणार पत्रकार संघ पत्रकारांच्या सन्मानासाठी सुद्धा पुढे असतो यापुढे  देखील पत्रकार संघाच्या माध्यमातून असे उपक्रम राबविले जाती असे आश्वासित केले.
यांनी स्वीकारला पुरस्कार – उत्कृष्ठ पत्रकार पुरस्कार्थींचे नावे- 1) रवींद्र मोरे,शशिकांत पाटील, नरेश बागडे, ईश्वर महाजन,चेतन वाणी,वसंतराव पाटील,गोपाल व्यास,रविशंकर पांडे ,गोपाल सोनवणे,ज्ञानेश्वर राजपूत,प्रमोद ललवाणी,प्रमोद पवार ,मिलिंद सोनवणे,सी.एन.चौधरी,स्वप्नील सोनवणे,सचिन पाटील,शिवाजी शिंदे,अनिल येवले,उत्कृष्ठ लेखन पुरस्कार प्रा.डॉ.जगन्नाथ गोपाळ
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अयाज मोहसीन तर आभार सी.एन.चौधरी सर यांनी मानले यांनी केले.कर्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली .कार्क्रमाच्या यशस्वीतेसाठी महानगरध्यक्ष राजेंद्र पाटील, महानगर सचिव दीपक सपकाळे ,ग्रामीण जिल्हाध्यक्ष भूषण महाजन,महानगर कार्याध्यक्ष रितेश माळी,शरद कुलकर्णी, जिल्हा उपाध्यक्ष शैलेश पाटील,संभाजी देवरे,सुनील भोळे,जिल्हा सचिव मनोज भांडारकर, परशुराम बोन्डे, सुकलेल सुरवाडे, मुकेश जोशी,चेतन निंबोळकर,यांनी यांचे सहकार्य लाभले.
बाळकडू प्रतिनिधी | स्वप्नील सोनवणे