दुष्काळाची मदत तालुक्यातील शेतकऱ्यांपर्यत तात्काळ पोहचवा अन्यथा रस्त्यावर उतरू – मा.आ. विजयराज शिंदे खरबडी येथे शिवसेना कार्यकर्ता मेळावा संपन्न

मोताळा- रडत असलेल्या माणसाला हसत पाठवण्याची किमया ही तुमच्यामध्ये असली पाहिजे नेता हा कार्यकर्त्याच्या सुखदुःखात सहभागी होणार असावा त्याने एकोपा होतो असे प्रतिपादन माजी आमदार विजयराज शिंदे यांनी खरबडी येथे आयोजित कोथळी जिल्हा परिषद सर्कलच्या शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात आज दि 6 जानेवारी रोजी केले. तालुक्यातील ग्राम खरबडी येथे कोथळी जिल्हा परिषद सर्कलच्या शिवसेना मेळाव्याचे आयोजन करन्यात आले होते मेळाव्यात आगमन प्रसंगी उपस्थित कार्यकर्ते व शिवसैनिक यांनी जल्लोशपूर्ण वातावरणात जयघोष करून विजयराज शिंदे यांचे स्वागत केले.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी राजूभाऊ खर्चे, तर शिव वाहतूक सेनेचे जिल्हा प्रमुख संजय हाडे, गजानन मामलकार, शहर प्रमुख रवी पाटील, उप ता प्र सुखदेव शिंबरे, प्रभाकर पाटील, शिवशंकर हरमकार, भूमी हक्क परिषदचे अध्यक्ष के जी शाह,पुरुषोत्तम लाखोटीया, किटू किनगे , मयूर किनगे, यांची प्रमुख उपस्थिती होती. ८०टक्के समाजकारण हा शिवसेनेचा धर्म असून कर्तृत्वाने व कार्याने माणूस मोठा होतो नाव हे कामामुळेच मोठे होते म्हणूनच या जनतेने विजयराज शिंदेंना मोठे केले आहे हे कोण्या गद्दारामुळे झाले नाही शिवसेना हा समाज उद्धाराचा मूलमंत्र असून त्यावर आपण सतत कार्यरत राहू दुष्काळाची मदत तालुक्यातील शेतकऱ्यांपर्यत तात्काळ पोहचवा अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशारा विजयराज शिंदे यानी आपल्या भाषणातून शासनास दिला .
सदरच्या मेळाव्याला कोथळी बोराखेडी जिल्हा परिषद सर्कल मधील मुस्लीम समाजाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती तर मोताळा येथील शिवसेना कार्यकर्ते बादर कुरेशी यांच्या नेतृत्वामध्ये माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कलीम शा ठेकेदार, हसन ठेकेदार, महंमद कुरेशी, अख्तर कुरेशी, यांच्यासह अन्य युवकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला मेळाव्याला संबोधित करताना भूमी हक्क परिषदे चे अध्यक्ष यांनी समस्त मुस्लिम समाज हा मा आ विजयराज शिंदे यांच्या पाठीशी असुन बुलढाणा विधानसभेवर भगवा फडकावुन मा आ विजयराज शिंदे यांना विजयी करण्यासाठी कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन यावेळी केले तर नारायण कोल्हे,गजानन मामलकर,प्रदीप जैन,अर्जुन दांडगे,सचिन शेळके अंजलीताई खुपराव तथा आदीं मान्यवरांनी आपल्या टोकदार भाषणांतून विजयराज शिंदे यांना भगवा फडकवत विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला
यावेळी डॅा.रवींद्र महाजन शामराव बिचकुले, बाळु देशमुख,प्रकाश नारखेडे,संजय निमकर्डे,जवानसिंग नाईक,एकनाथ जाधव,प्रभाकर पाटील,संजय शेळके,शिवा खुपसे,दिनेश दिवाने,धोंडु हागे,संदीप वनारे,पुरूषोत्तम दाणे, जिया खा,अमिन खा,रशिद बाबा,बादर कुरेशी, सुदाम पाटील, नाना राजगुले, गजानन कुर्हाळे, सादु सेठ,अंजनाताई खुपराव,राजेंद्र कोलते यांच्या सह शेकडो कार्यकर्ते व शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप सुपे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा सुनील मामलकर यांनी केले…

तुषार पंत बुलढाणा तालुका प्रतिनिधी
बुलडाणा