पंचगंगा नदी प्रदूषण मुक्ती संदर्भात शिवसेनेच्या पुढाकाराने पदयात्रा काढून “नदी प्रदूषण मुक्ती जागर” संगमापासून ते उगमापर्यंत…..

बाळकडू प्रतिनिधी- संतोष चव्हाण
पंचगंगा नदी प्रदूषण मुक्ती संदर्भात शिवसेनेच्या पुढाकाराने प्रदूषण मुक्ती पंचगंगा जागर संगम ते उगम असा ४ दिवस चालणाऱ्या पदयात्रा परिक्रमा ची सुरुवात कुरुंदवाड येथील संगम तीर्थ कृष्णा घाटावरील संताजी घोरपडे समाधी स्थळी विधिवत पाणी पुजन करून परिक्रमेचा शुभारंभ झाला यावेळी शिवसेनेचे युवा नेते धैर्यशील माने,आमदार उल्हास पाटील,डॉ. बुधाजीराव मुळीक जिल्हाप्रमुख संजय पवार,विजय देवणे,मुरलीधर जाधव दलित मित्र अशोकराव माने शिरोळ चे नगराध्यक्ष अमरसिंह पाटील जयसिंगपूर चे नगराध्यक्ष डॉक्टर नीता माने कुरुंदवाडचे नगराध्यक्ष जयराम बापू पाटील गणपतराव पाटील आदीसह मान्यवर उपस्थित होते.
सदर पंचगंगा नदी प्रदूषण मुक्ती जागर प्रदूषणा बाबत दि .०४ जानेवारी रोजी कुरुंदवाड संगम येथून पदयात्रा सुरु झाली असून शिरढोण,टाकवडे मार्गे इंचलकरंजी (जिव्हाजी मंगल कार्यालय )येथे मुक्कामी आहे .तसेच दि.०५ जानेवारी रोजी पदयात्रा चंदूर,रुई , माणगांव ,रुकडी मार्गे वळीवडे येथे मुक्कामी जाणार आहे.व दि.०६ जानेवारी रोजी पदयात्रा वळिवडे ,गांधीनगर ,कोल्हापूर आंबेवाडी मार्गे पंचगंगा नदी उगम प्रयाग चिखली ता.करवीर येथे पोहचणार आहे.तसेच पदयात्रेचा समारोप दि.०७ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे होणार आहे .
तरी पंचगंगेला गतवैभव प्राप्त करून देणेसाठी दि.०५ जानेवारी २०१९ रोजी सदर पदयात्रेमध्ये शहरातील नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व नगरसेवक व गावातील ग्रामपंचायत सरपंच ,उपसरपंच ,सदस्य तसेच सर्व संस्थांचे पधादिकारी, शैक्षणिक ,सहकारी संस्था,तरुण मंडळे,महिला बचत गट व शहरातील / गावातील सर्व ग्रामस्थ यांनी सहभागी व्हावे असे आवाहन कोल्हापूर जिल्हा शिवसेने मार्फत करण्यात आले आहे.