घोडबंदरला वाहतुक कोंडी मुक्त करण्याठि सव्र्हीस रस्त्यावरील गॅरेज शुक्रवार पासून बंद करण्याचे आदेश महापालिका .

बाळकडू | संदीप देवकांबळे
ठाणे – मेट्रो, महापालिकेच्या विविध विभागांची सुरु असलेली कामे, सेवा रस्त्यांमध्ये सुरु असलेली कामे, पार्कीग, गॅरेज वाल्यांनी अडविलेले रस्ते यामुळे घोडबंदरला वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी कापुरबावडी ते भाईंदरपाडय़ार्पयतच्या दोन्ही बाजूच्या सव्र्हीस रस्त्यावरील गॅरेज शुक्रवार पासून बंद करण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले आहेत. तसेच मेट्रोसाठी लावण्यात आलेले बॅरीकेटेक्स जेवढी आवश्यकता असेल त्यानुसारच ते लावण्यात यावेत, सेवा रस्त्यावरील पार्कीग बंद करावी, याशिवाय जलवाहीनी टाकण्याचे आणि मलनिसारण वाहीनी टाकण्याचे काम हे एकाच वेळी करण्यात यावे असे स्पष्ट निर्देशही त्यांनी दिले.

घोडबंदर येथील वाहतुक कोंडी बाबत गुरुवारी आयुक्तांनी तत्काळ एमएमआरडीए, मेट्रो, वाहतुक पोलीस आणि महापालिकेच्या विविध विभागांच्या अधिका:यांची बैठक लावून यावर कोणत्याही परिस्थितीत तातडीने उपाय योजना करण्यात यावी असे स्पष्ट आदेश दिले. मागील काही दिवसापासून घोडबंदर भागात मेट्रोचे काम सुरु झाले आहे. परंतु काही ठिकाणी रस्त्याच्या मधोमध, सव्र्हीस रस्त्यांवर बेरीकेट्स लावण्यात आले आहेत. परंतु या कामासाठी जेवढी आवश्यकता असले त्यानुसार आणि जिथे काम सुरु असेल तेवढय़ाच ठिकाणी बेरीकेट्स लावण्यात यावेत असे स्पष्ट निर्देश यावेळी आयुक्तांनी मेट्रोच्या संबधींत अधिका:यांना दिले. याशिवाय मलनिसारण वाहीनेचे जे काम सुरु आहे, त्यातील ब्रम्हांड ते डीमार्ट र्पयतचे काम 15 जानेवारी र्पयत पूर्ण करावे, तसेच उर्वरीत काम हे टप्याटप्याने करण्याच्या सुचनाही त्यांनी पालिकेच्या संबधींत विभागाला दिल्या. याशिवाय जलवाहीन्या टाकण्याचे काम आणि मलनिसारण वाहिन्या टाकण्याचे कामही एकाच वेळेस दोनही विभागांनी आपसात संगणमत करुन वेळेत करावे असे निर्देश त्यांनी दिले. तर जो र्पयत डाव्या बाजूकडील ही कामे पूर्ण होत नाहीत, तो र्पयत उजव्या बाजूकडील सेवा रस्त्यावर कोणत्याही स्वरुपाची कामे केली जाणार नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

घोडबंदरचा दोन्ही बाजूचा सव्र्हीस रस्ता हा गॅरेज वाल्यांनी व्यापला आहे. त्यामुळे सुध्दा वाहतुक कोंडीत भर पडत आहे. यावर उपाय म्हणून कापुरबावडी ते भाईंदर पाडय़ार्पयतची गॅरेज शुक्रवार पासून बंद करण्याचे आदेशही यावेळी आयुक्तांनी वाहतुक पोलिसांना आणि पालिकेच्या संबधीत विभागाला दिले. याशिवाय या भागात हॉटेल आणि सोसायटीवाल्यांची जी काही वाहने उभी राहतात, ती वाहने सव्र्हीस रोडच्या डाव्या बाजूला एकाच लेन मध्ये उभी करण्यात यावीत अशी सुचनाही त्यांनी दिली. वाहतुक कोंडीवर उपाय करण्यासाठी या भागातील अंतर्गत रस्त्यांची कामे सद्यस्थितीत कोणत्या स्टेजवर आहेत, निविदा काढल्या गेल्या आहेत, किंवा नाही हे तपासतांना त्या लवकर काढून अंतर्गत रस्त्यांची कामे जून र्पयत पूर्ण करावीत असेही त्यांनी यावेळी सांगितले.