दुष्काळ ग्रस्त भागातील विद्यार्थाची तात्काळ फी माफी करावी – युवासेनेचे मागणी

(तालूका प्रतिनिधी)
अकोला:- युवासेना कॉलेज कक्ष अकोला जिल्हा वतीने,
श्री शिवाजी महाविद्यालय मध्ये दुष्काळ ग्रस्त भागातील विद्याथ्यांच्या फी माफी बद्दल महाविद्यालय प्रशासनाला व प्राचार्य मा. रामेश्वर भिसे सरांना विचारणा करण्यात आली.व लवकरात लवकर या फी बद्दल निर्णय घेऊन विद्याथ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात यावे असे युवासेना कॉलेज कक्ष च्या वतीने करण्यात आले…… आता पर्यंत २७७६ विद्यार्थी या दुष्काळ ग्रस्त भागात येतात परंतु शासनाच्या हलगर्जीपणामुळे आतापर्यंत केवळ २५ विद्याथ्यांच्या खात्यामध्ये परीक्षा फी जमा झालेली असून उर्वरित परीक्षा फी जमा कधि होणार ? या उर्वरित फी न जमा न झाल्याने याला जबाबदार कोण ? असे प्रश्न या वेळी उपस्तित करून.. शासनाला नांवाची यादी सादर करून पुढल्या सोमवार पर्यंत संपूर्ण विद्याथ्यंच्या खात्यामध्ये रक्कम जमा न झाल्यास युवासेना कॉलेज कक्ष समाज कल्याण विभागावर युवासेना तर्फे विद्यार्थी समवेत आंदोलन करण्यात येणार असे आवाहन युवासेना कॉलेज कक्ष प्रमुख अकोला सौरभ नागोसे यांनी प्रशासनाला व महाविद्यालयाला दिला आहे ……
यावेळी प्रामुख्याने युवासेना उपजिल्हा प्रमुख मा. दीपकभाऊ बोचरे, योगेश भाऊ बुंदेले,युवासेना अकोला ता. प्रमुख मा.अस्तिक चव्हाण,ता. संघटक शुभम सावरकर,युवासेना शिवाजी महाविद्यालय कॉलेज कक्ष अध्यक्ष शुभम टाले, अक्षय तायडे,अक्षय राऊत,रजत राऊत,शंतनू सावंत,शैलेश राऊत व आदी शिवाजी महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्तित होते..

आनंदकुमार बहुरूपे
बाळापूर तालुका प्रतिनिधी बाळकडू
anandbahurupe123.ab@gmail.com
9922643346