युवासेना प्रमुख मा.आदित्य जी ठाकरे यांच्या दौऱ्या संदर्भात युवासेना सचिव मा.पुर्वेशजी सरनाईक यांचा “युवासंवाद विदर्भ दौरा”..

(तालूका प्रतिनिधी)
०७ जाने २०१९
अकोला:-येणाऱ्या लोकसभा आणि त्यापाठोपाठ येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवासेना प्रमुख मा.आदित्यजी ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्या संदर्भात पूर्वतयारीसाठी येणाऱ्या १५,१६,१७ जानेवारी ला युवासेना सचिव मा.पूर्वेशजी सरनाईक यांचा “युवासंवाद विदर्भ दौरा” हा कार्यक्रम आयोजित केला आहे.तरी यासंदर्भात अकोला जिल्हा युवासेना प्रमुख विठ्ठल सरप पाटील यांनी युवासेना सचिव मा.पूर्वेशजी सरनाईक यांची मुंबई येथे भेट घेतली व सविस्तर चर्चा करून अकोला जिल्ह्यात आपले “युवासंवाद विदर्भ दौऱ्यानिमित्य” युवासेना अकोला च्या वतीने स्वागत आहे असे सांगितले.या कार्यक्रमामुळे युवासैनिकांमध्ये नवचैत्यन्य निर्माण होईल व त्यानंतर होत असलेल्या युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांच्या दौऱ्यापर्यत तो सर्वतोपरी सज्ज झालेला असेल.कारण येणाऱ्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत फक्त आणि फक्त शिवसेनेचा भगवा फडकविल्याशिवाय युवासैनिक राहणार नाही.त्यामध्ये या मार्गदर्शनपर कार्यक्रमानिमित्य युवासैनिकांना आणखी बळ मिळेल.
# Purvesh Pratap Sarnaik # Shivsena #Yuvasena # Akola.

आनंदकुमार बहुरूपे
बाळापूर तालूका प्रतिनिधी बाळकडू
anandbahurupe123.ab@gmail.com
9922643346