निगडी ते दापोडी मेट्रोच्या अनाधुंद कारभाराच्या निषेधार्थ मेट्रोचे उपव्यवस्थापक संजय डूबे यांना इशारा.

पिंपरी :- विनोद गोरे.
गेल्या दोन ते तीन वर्षांपासुन निगडी ते दापोडी रोडवर मेट्रोचे काम शिर्के कंपनीने हातात घेतले असुन
सदर कंपनी वारंवार वादाच्या भोवऱ्यात पहावयास मिळत आहे गेल्या काही दिवसांपूर्वी मेट्रोच्या धावण्यासाठी शिर्के कंपनीकडून निष्क्रीय दर्जाचा पिलर बनविल्याचे निदर्शनास आले होते.
तसे संबंधित विभागाच्या भागाच्या लक्षात आनुन दिल्यानंतर तो पिलर पाडण्यात आला होता. मेट्रोचे काम हाती घेतलेल्या ठेकेदार कंपनीच्या अशाप्रकारच्या अनेक गंभीर गोष्टी समोर आलेल्या आहेत.
त्यातच शनिवार दि. ५ जानेवारी ला दूपारी अडीच च्या सुमारास नाशिक फाटा कासारवाडी या ठिकाणी मोठी क्रेन कोसळली सुदैवाने या अपघातात कोणत्याही प्रकाराची जिवीत हानी झाली नाही. सदर कंपनीचा बेभरवशी व अनाधुंदी कारभार पुन्हा समोर आल्याचे दिसून आले.
त्याविरोधात सदर शिर्के कंपनी कडुन निगडी ते दापोडी मेट्रोचे काम करित आसताना कामगारास काही अपघात झाल्यास किंवा अपघातामध्ये कामगार गंभीर झाल्यास तसेच दगावल्यास सदर कंपन्याचे मेट्राचे काम शिवसेना स्टाईलने बंद करण्यात येईल असा इशारा शिवसेना व शिवशाही व्यापारीसंघाच्या वतीने मेट्रोचे उपव्यवस्थापक संजय डूबे यांना देण्यात आला.
यावेळी शिवसेना विधानसभा संपर्कप्रमुख तथा शिवशाही व्यापारीसंघ प्रदेशाध्यक्ष युवराज दाखले , प्रदेश सचिव गणेश आहेर, प्रदेश उपाध्यक्ष तथा शिवसेना विभागप्रमुख गोरख पाटील, प्रदिप दळवी, मारूती मस्के, प्रविण भाऊ खरात, दत्ता गिरी, बाळासाहेब गायकवाड, गणेश पाडुळे, खंडु क्षिरसाठ , पुणे शहर महीला अध्यक्षा सुनिताताई खंडाळकर, सारीकाताई ताम्हचीकर आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.