युवासेनेचे कोरेगाव येथील शेतकरी आंदोलन

बाळकडू | किशोरकुमार गांधी
सातारा जिल्हयातील ऊस उत्पादक शेतकरयांची गेल्या वर्षाची थकीत रक्कम…… आणि चालू हंगामाची ऊस गाळप झाल्या पासूनची आज अखेरची पंधरा टक्के व्याजासह रक्कम….. एक रकमी शेतकऱ्यांना पंधरा दिवसात मिळावी या मागणीसाठी कोरेगाव येथे शिवसेनेच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला या मोर्चास कोरेगाव तालुक्यातील हजारो शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ऊसाची दरातील एफ आर पी कलम 166 प्रमाणे ऊस गाळप झाल्यापासून
चौदा दिवसात हि रक्कम देने कारखानदारांना बंधनकारक आहे मात्र जिल्हयातील ५ कारखान्यांनी हि रक्कम अद्याप दिली नसल्यामुळे येत्या २६ जानेवारी पर्यन्त शेतकरयांच्या खात्यात ही रक्कम जमा न झाल्यास मोठ जन आंदोलन उभारणार असल्याचे यावेळी इशारा युवासेना जिल्हा प्रमुख रणजीत भोसले यांनी दिला आहे..