घाटकोपर पश्चिम मध्ये कोकण महोत्सवाचे आयोजन

बाळू राऊत मुंबई प्रतिनिधी
मुंबई ०७ कला, संस्कृती आणि खाद्य परंपरेचा खजिना म्हणजे ‘कोकण महोत्सव’ याच कोकण महोत्सवाचे आयोजन घाटकोपर पश्चिम मधील माणेकलाल मैदानात करण्यात आले आहे.हे महोत्सवाचे ५ वे वर्ष आहे.७ जानेवारी ते १६ जानेवारी पर्यंत चालणाऱ्या या महोत्सवाचे उदघाटन ईशान्य मुंबई विभाग प्रमुख राजेंद्र राऊत यांनी केले .त्यावेळी उपविभाग प्रमुख विलास पवार, सुभाष पवार , विजय पडवळ , नगरसेवक सुरेश पाटील , नगरसेवक किरण लांडगे , मा.नगरसेवक दिपक बाबा हांडे , मा.नगरसेवक संजय भालेराव, मा .नगरसेवक सुरेश आवाले ,मा.नगरसेविका अश्विनीताई मते , सुनील बागवे , सुनिल पाटील , घनश्याम रजपूत ,अमीनभाई फैसल , प्रेम यादव , शाखाप्रमुख शिवाजी कदम , मयूर राठोड , संतोष साळुंके , संजय कदम , अजय भोसले , जनार्दन पार्टे , संतोष सावने , नाना तटले, अशोक शिरधनकर , शैलेश कौदरे , हनुमंत शिंदे , मोरे नाना , गणेश मोरे , हेमंत मोराजकर , रोहित सोनावणे, नितीन इंगळे , शुभम पारखे , सुभाष कोकाटे , संतोष मोरे , भरत उपाध्याय , शिवाजी जाधव , , दत्ता करभिले , हसनभाई , मेहबूब भाई , रफिकभाई , मोमीन भाई , समाजसेवक शिवाजी डोंगरे , समाजसेवक काळूभाई रेहमान , अखिल भारतीय सेनाचे जयवंत वाघमारे , भाजपा चे प्रकाश पाटील ,पार्वती शेंडगे ,
चारुशीला चव्हाण, संजनाताई सारंग , कमलताई चिंचपुरे , मालती जाधव ,शाखा संघटिका म्रूणाल राठोड पुजा सुर्वे , सुमंगल तेली , स्मिता शिर्सेकर , सुनंदा तळेकर , प्रतिक्षा पवार , संगीता तुळसकर , सुषमा चव्हाण , मनीषा लांडे , पारु पटेल , अमिना कुरेशी , ज्योती भारडे
विभागप्रमुख राजेंद्र राऊत यांनी आपल्या भाषणात सांगितले की lया महोत्सवात कोकणातल्या संस्कृतीसोबतच तिथली खाद्य संस्कृती देखील चांगलीच प्रसिद्ध आहे. या महोत्सवात देखील कोकणातील खाद्य पदार्थ, कोंबडी वडे , माशांच्या विविध पाककृती, रुचकर सोलकढी ते पारंपरिक गोड पदार्थांची चव चाखायला मिळेल तसेच क्रीडा, कला, संस्कृती, खाद्याचा आस्वाद लुटता येणार
तसेच पहिल्या दिवसापासून समारोप दिवसापर्यंत विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून सदर कार्यक्रम आणि कोकण महोत्सव घाटकोपर पश्चिम मधील माणेकलाल मैदानात संपन्न होणार असून न नागरीकांनी प्रत्येक दिवशी हजेरी लावून कोकण महोत्सवाची शोभा वाढवावी असे आवाहन मा.शाखाप्रमुख व घाटकोपर विभाग संघटक आणि स्वराज फाउंडेशनचे अध्यक्ष प्रदीप मांडवकर यांनी केले आहे .