पत्रकार हा समाजातील वंचितांचा व शोषितांचा आवाज – हरूण शेख

लासलगाव(प्रतिनिधी)समीर पठाण

मराठी पत्रकारितेचे जनक ‘दर्पणकार’आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पत्रकार दिनाचे आयोजन नूतन विद्या प्रसारक मंडळाचे इंग्लिश मेडीयम स्कूलमध्ये नुकतेच करण्यात आले.या कार्यक्रमासाठी लासलगाव प्रेस क्लबच्या सर्व पत्रकारांना निमंत्रित करण्यात आले होते.
पत्रकार हा समाजातील वंचितांचा व शोषितांच्या वेदनांना फुंकर घालून त्यांचा आवाज बुलंद करत आसतो.वार्तांकन करतांना अनेक आव्हानांचा मुकाबला करून सत्य परिस्थिती समाजापुढे मांडण्याचे कार्य पत्रकार अहोरात्र करत आहे. जनसामान्यांच्या विचारांना बळ आणि शब्दांना धार देणारे निर्भेड पत्रकार हेच समाजाचे खरे आरसे आहेत असे प्रतिपादान जेष्ठ पत्रकार हरूण शेख यांनी केले.

प्रारंभी सर्व पत्रकारांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकरांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करण्यात आले. याप्रसंगी लासलगाव प्रेस क्लबचे अध्यक्ष उमेश पारीख,अरुण खांगळ,शेखर देसाई,समीर पठाण,निलेश देसाई,राकेश बोरा,असिफ पठाण आदिंसह शाळा व्यवस्थापन समितीचे चेअरमन संदीप होळकर,सदस्य हसमुखभाई पटेल,योगेश पाटील,चंद्रशेखर होळकर,सचिन मालपाणी आदी उपस्थित होते.
संयोजकांच्या वतीने पत्रकार बंधूंच्या कार्याचा गौरव करून सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी प्रेस क्लबचे अध्यक्ष उमेश पारीख यांनी संयोजकांच्या उपक्रमाचे कौतुक करून शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेऊन सुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक सत्तार शेख यांनी केले व पत्रकारांच्या प्रश्नांसाठी समाजाने पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली. सूत्रसंचालन मीनल होळकर व आभार प्रदर्शन प्रणोती शिंदे यांनी केले.