भिवंडीमधील खोणी गावातील गरिब शेतकरी दिपक बागल यांची ७ महीने गाभण असलेली गाय पळवून नेवून तिची कत्तल खाण्यात कत्तल

प्रतिनिधी – कल्पेश कोरडे
दि.८ जाने (भिवंडी) …
महाराष्ट्रात २ मार्च २०१५ रोजी “गोवंश हत्या बंदी कायदा” लागू करण्यात आला होता. खुद्द महामहीम “राष्ट्रपती प्रणव मुखर्जी” यांनी या कायद्यावर स्वाक्षरी केली होती……
पण कायदा सुव्यवस्था फाट्यावर मारत भिवंडीतील सराईत चोर-गुन्हेगार सर्रास पणे हिंदू धर्मातील माता मानल्या जाणाऱ्या गाईची कत्तल (गोहत्या) करत आलेत.
नुकतेच भिवंडीमधील खोणी गावातील गरिब शेतकरी दिपक बागल यांची ७ महीने गाभण असलेली गाय मुख्य सुत्रधार “अनिस कटोरा, गुड्डू , शरिफ , मोजिन , अबू सात”नामक ५ मुस्लिम गुन्हेगारांनी दिपक बागल यांच्या घराशेजारील गोठ्यातून ४ जानेवारी पहाटे १ ते ४ या सुमारास पळवून नेवून तिची कत्तल खाण्यात कत्तल केली गेली. असा कबूली जबाब पकडण्यात आलेल्या शरिफ नामक आरोपीने दिला असून इतर आरोपी फरार आहेत यासंबंधी पुढील तपास “निजामपूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरिक्षक श्री.दिपक सरोदे” हे करत आहेत.
सदर प्रकरणात पुढील तपास चालू असून अद्याप एक महिंन्द्रा XUV व वेगवेगळ्या डुब्लिकेट गाडी नंबर प्लेट्स, तसेच गुंगीचे औषध, इंजेक्शन्स व इतरही काही गोष्टी छापेमारीत जप्त केल्या आहेत.
सदरिल गोहत्येच हे प्रकरण पहीलं नसून अद्याप पर्यंत अनेक प्रकरणं भिवंडीत घडत आलेली आहेत. आणि ह्या सर्व गोहत्या प्रकरणात भिवंडी व अनेक ठिकाणच्या सराईत टोळीचा मोठा हात आहे.

आज शेतकरी हवालदील झाला आहे, “शेतकऱ्यांची खरी खुरी दौलत अन आई समजणाऱ्या गाईला” घरातून पळवून नेऊन जर कत्तल होत असेल तर यापेक्षा दुसरं दुर्दैव शेतकऱ्यासाठी कोणतचं नसाव.

सदरील आरोपींवर ३१९ , ४२९ , ३४ , ३७९ इ. कलमे लावण्यात आले असून दोन दिवशीय पी.सी.आर (P.C.R.) न्यायालयाकडून देण्यात आली आहे व पुढील तारिख १० तारखेला दिली आहे. अशी माहीती सूत्रांशी बोलताना मिळाली.