बी.एन.एन (BNN) महाविद्यालय येथे मटका-जुगार-नशा मुक्त महाराष्ट्र अभियान अंतर्गत जन जागृती मोहीमेचे आयोजन

बाळकडू न्यूज नेटवर्क BNN प्रतिनिधी- कल्पेश कोरडे
दि.८ जाने (भिवंडी)…..
एकीकडे महाराष्ट्र भर दारूबंदी – मटकाबंदी कायदे आमलात आणून कायद्याचे रक्षक जनतेचे सेवक पोलिस प्रशासन आपले काम चोख पार पडते. पण पांढऱ्या शुभ्र दूधात माशी पडावी असला प्रकार भिवंडी पोलिस प्रशासन करत आहे.
आज बी.एन.एन (BNN) महाविद्यालय येथे मटका-जुगार-नशा मुक्त महाराष्ट्र अभियान अंतर्गत शहरातील खुले आम अन पोलिसांच्या नाकाखाली राहून सर्रास पणे चालू असणाऱ्या मटका-जुगार-नशा या अति गंभिर समस्येवर “मटका-जुगार-नशामुक्त महाराष्ट्र अभियान” अंतर्गत जन जागृती मोहीमेचे आयोजन केले होते.
आजच्या धाव पळीच्या जगात खासकरून तरुण पिढी व्यसनाधीन होत असून भविष्यात तरुण पिढीच भवितव्य अंधारातच राहील….
ही बाब लक्षात आणून देण्याच काम खुद्द बी.एन.एन. महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व मटका-जुगार-नशा मुक्त महाराष्ट्र चे प्रमुख सर्वेसर्वा श्री.बालाजी भारत नवले व मटका-जुगार- नशामुक्त महाराष्ट्रचे प्रमुख श्री.मुस्तफा शेख तसेच प्रमुख व कायदेविषयक मार्गदर्शक ॲड.श्री.अमोल कांबळे यांनी तरुण विद्यार्थ्यांन समोर मांडली.
या मार्गदर्शन पर्वात “पोस्टकार्ड मोहीमेची” सुरुवात विद्यार्थी गणांनी पोस्ट कार्डवर दारुबंदी-नशामुक्ती तसेच मटका जुगारबंदीसाठी लिखाण करुन खुद्द नामदार.मुख्यमंत्री श्री.देवेद्रजी फडनवीस यांना पाठवून केली आहे. व या प्रकारचे अनेक पत्र यापुढे ही सतत मा.मुख्यमंत्री महोदयांकडे विद्यार्थी गण व जनसामान्यांन कडून मटका-जुगार-नशामुक्त महाराष्ट्र समितीच्या वतीने सुपूर्द केली जातील असा इशारा सुद्धा श्री.बालाजी नवले यांनी दिला आहे.
तसेच मटका-जुगार-नशामुक्त महाराष्ट्र समितीच्या वतीने लवकरच मोठ मोठ्या प्रमाणात सुशिक्षित व जन सामान्य व सुजाण नागरिक यांच्या जनजागृती मार्फत भव्य अशी राज्य पातळीवर कार्य करुन फक्त भिवंडीतूनच नव्हे तर संपूर्ण राज्य भरातूनच मटका-जुगार नावाची घाण साफ करण्याच काम “मटका-जुगार-नशामुक्त समिती” करणार असल्याची माहीती श्री.बालाजी नवले श्री.मुस्तफा शेख तसेच ॲड.अमोल कांबळे यांनी सूत्रांशी बोलताना दिली.