भूजल मैत्री या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळेच आयोजन

बाळकडू | साहेबराव परबत
सोलापूर,ता ०९ : शाश्वत दुष्काळ निर्मूलन आणि पर्यावरण-जलसमृद्ध गाव निर्माण करण्याच्या प्रक्रियेतील अत्यंत महत्वाचा टप्पा असणारी”भूजल मैत्री”या विषयावर दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन मनोहर मंगल कार्यालय(मेहेंदळे गॅरेंज),एरंडवणे,पुणे येथे,10 व 11 जानेवारी रोजी करण्यात आले आहे
समग्र नदी परिवार,महा NGO फेडरेशन,टिळक महाराष्ट्र विद्यापीठ,बुलढाणा को.ऑप,सो,महेश सहकारी बँक,जलस्वराज्य फेडरेशन कर्जत,जलसंवर्धन अभियान सोलापूर इत्यादी सहयोगी संस्थांच्या सहकार्याने याचे आयोजन केले आहे
ही कार्यशाळा निशुल्क आहे परंतु नाव नोंदणी आवश्यक, इच्छूक व्यक्ती व संस्थांनी मोठ्या संख्येने samagranp@gmail.com अथवा 9834587307 किंवा 9975413534 यावर नोंदणी करावी असे आवाहन जलकन्या भक्ती जाधव,जलसंवर्धन अभियान,सोलापूर यांनी केले आहे.