कळवण तालुक्यात ममता दिन साजरा

ललित आहेर (कळवण ता.प्रतिनिधी )
शिवसेना कळवण तालुका व शहारातर्फे ममता दिन साजरा करण्यात आला. कळवण कार्यालयात तालुकाप्रमुख अंबादास जाधव व महीला आघाडी तालुका संघटक प्रितीताई मेणे यांनी स्व.माॕ.साहेबांच्या प्रतिमेस पुष्पाजंली वाहुन अभिवादन केले. यावेळी शहरप्रमुख साहेबराव पगार ,वि.स.संपर्कप्रमुख संभाजी पवार,वि.स.संघटक दशरथ बच्छाव, उप ता.प्रमुख विनोद भालेराव, विभागप्रमुख शितलकुमार आहिरे ,पंकज मेणे ,ग्राहकसंरक्षण कक्षचे संजय रौंदळ ,उपशहरप्रमुख विनोद मालपुरे ,आप्पा बुटे ,युवासेना ता.अधि. मुन्ना हिरे, भाजपा शहराध्यक्ष निंबा पगार, पत्रकार संघाचे अध्यक्ष बापु देवरे, पत्रकार दिपक झाल्टे, दिपक सोनवणे, ललित आहेर उपस्थितीत होते.
तसेच कळवण शहरात वासल्यमुर्ती माॕ.साहेब स्व. मीनाताई ठाकरे यांच्या प्रतीमेस पुष्पाजंली वाहुन अभिवादन करतांना उपजिल्हाप्रमुख जितेंद्र वाघ, माजी तालुकाप्रमुख प्रकाश आहेर ,ग्राहकसंरक्षण कक्षतालुकाप्रमुख नाना देवरे, माजी शहरप्रमुख तथा जेष्ठ शिवसैनिक आण्णा पगार, शामानाना पगार ,राजेंद्र सोनजे, युवासेनेचे सचिन पगार, नरेश पगार, छावा संघटना तालुकाअध्यक्ष प्रदिप पगार ,बांधकाम व्यावसायिक भामरे साहेब उपस्थितीत होते.
यावैळी माजी तालुकाप्रमुख प्रकाश आहेर यानी सांगितले की आजपासुन ममता दिन ते शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतीदिना (२३जानेवारी)पर्यंत कळवण तालुक्यात जुने,जेष्ठ, माजी शिवसैनिक व पदाधिकारी यांना भेटुन त्यांच्याशी हितगुज करणे,अडीअडचणी जाणुन, त्यांच्याशी थेट संवादजोडो अभियान राबविण्यात येणार आहे.