व्हाट्सअप फेसबुक द्वारे महिलांची छेडछाड होत असले तर त्यांनी याकडे दुर्लक्ष नकरता, ताबोडतोब पोलिसांमध्ये तक्रार द्यावी…वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल तांबे यांनी मत

पुणे शहर प्रतिनिधी (बाळकडू)
अभिजीत बाबर
हडपसर : व्हाट्सअप फेसबुक द्वारे महिलांची छेडछाड होत असले तर त्यांनी याकडे दुर्लक्ष नकरता, ताबोडतोब पोलिसांमध्ये तक्रार द्यावी, याबाबत पोलीस सायबर ब्रँच द्वारे याची तपासणी करून संबंधित आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्यावर कारवाई केली जाते. यासाठी महिलांनी सतर्क राहून अनोळखी व्यक्ती सोबत चॅटिंग करू नये, यामधून होणाऱ्या समस्या उदभवणार नाहीत याची काळजी महिलांनी घेतली पाहिजे. असे हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल तांबे यांनी मत व्यक्त केले.
हडपसर येथील गंगातारा सोशल फाउंडेशनच्या वतीने सावित्रीमाई फुले यांच्या जयंती निमित्त, हडपसर परिसरातील शैक्षणिक अद्योगिक सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांना पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी महाराष्ट्र आरोग्य मंडळाच्या समाज सेविका स्वाती जोशी, वकिली क्षेत्रातील अॅड. माधुरी देसाई, इंजिनिअर क्षेत्रातील हेमा लाळगे, शिक्षिका संध्या हिरमुखे, आर्किटेक्चर पोर्णिमा लुणावत या पाच महिलांना प्रमुख पाहुणे भरती वैद्य व सुनिल तांबे यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीमाई पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा नीता भोसले,पुणे जिल्हा बार असोशियनच्या सदस्या अॅड.लक्ष्मी माने, शीतल चांदणे, सामाजिक कार्यकर्त्या मनीषा माने,अॅड दिलीप जगताप, सुरेंद्र काडगे,पोलीस तानाजी देशमुख, मानवी संस्थेचे सचिन जाधव, साहेबराव भोसले, अॅड नितिन नितनवरे सह अनेक वकील उपस्थित होते. यावेळी तांबे यांनी महिलांच्या प्रश्नाविषयी संवाद साधला आणि पोलिसां विषयी अपेक्षा जाणून घेतल्या. यावेळी अनेक महिलांनी सुनिल तांबे यांनी प्रश्न विचारले, यावर त्यांनी हि त्यांचे समाधानकारक उत्तरे दिली. यावेळी समाजामध्ये शिक्षित महिलांनी सावित्री माईचा आदर्श घेऊन आपण हि समाजाच्या कामासाठी पुढाकार घ्यावा आणि धार्मिक कर्मकांड बाजूला ठेवून महिलांच्या उद्धार होईल आणि आपल्या देशाचे नाव कसे मोठे होईल याकडे महिलांनी लक्ष दिले पाहिजे. असे प्रमुख पाहुण्या जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या भरती वैद्य यांनी मत व्यक्त केले. सूत्रसंचलन स्वाती जगदाळे व आभार अॅड. प्रियदर्शनी परदेशी यांनी मानले.
फाउंडेशनच्या अध्यक्षा नीता भोसले यांनी सांगितले, कि फाउंडेशन हे महिलांच्या हक्कासाठी काम करणार असून. पीडित व गरजू महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर महिलांवर होणाऱ्या अत्याचारांना वाचा फोडण्यासाठी फाउंडेशनच्या माध्यमातून मोफत कायदा सल्ला केंद्र सुरु करण्यात येणार आहे.