कडाक्याच्या थंडीने सर्वाधिक झळ द्राक्ष बागांना. पंधराशे ते दोन हजारहून अधिक कोटी रुपयांचे द्राक्षांचे नुकसान होण्याची शक्यता–कैलास भोसले

लासलगाव(प्रतिनिधी)समीर पठाण

जम्मू-काश्मीर,हिमाचल प्रदेशात बर्फ दृष्टी होत असल्याने उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे कडाक्याच्या थंडीचे जोरदार आगमन होत किमान तापमानाचा पारा पाच अंश सेल्सिअस पेक्षाही कमी राहिल्याने निफाड तालुक्यातील द्राक्ष बागांना फटका बसला आहे .त्यामुळे पंधराशे ते दोन हजार कोटीहून अधिका रुपयांचे द्राक्षांचे नुकसान होणार असून तसेच मिरचीला ही मोठा फटका बसताना दिसत आहे.आज निफाड तालुक्यातील कसबे सुकेणा 2.5 अंश सेल्सिअस,शिवडी 3.3 अंश सेल्सिअस,सारोळे खुर्द 3 अंश सेल्सिअस तर कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रात 5 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे.

गेल्या दहा डिसेंबर पासून उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे निफाड तालुका गारठल्याने ठिकठिकाणी शेकोट्या पेटवून नागरिकांनी उब मिळवण्याचा प्रयत्न करत आहे या कडाक्याच्या थंडीचा मानवी जीवना बरोबर शेती पिकांवरही चांगला वाईट परिणाम होताना दिसत आहे गहू,हरभरा या पिकांना फायदा होतो तर द्राक्षांवर याचा परिणाम होत नुकसान होत आहे वाढत्या थंडीमुळे तसेच सध्‍या इराण, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या देशांकडून येणाऱ्या बाष्पामुळे द्राक्षबागांवर हिमकण गोठल्याने तयार झालेले द्राक्ष मणी भाजल्यागत झाल्याने याचा परिणाम म्हणून दोन लाख एकरा पर्यंत पोहोचले नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष बागांचे क्षेत्र धोक्यात येत 15 % नुकसान होणार असून त्याचा फटका पंधराशे ते दोन हजार कोटीहून अधिक रुपयांची नुकसान होण्याचा प्राथमिक अंदाज द्राक्ष उत्पादक संघाचे सदस्य कैलास भोसले यांनी व्यक्त केला आहे. या नुकसानीमुळे आर्थिक संकटात सापडत द्राक्ष उत्पादक शेतकरी आणखीन कर्जाच्या खाईत जाण्याची भीती व्यक्त केली आहे.

असे होतात थंडीमुळे द्राक्षबागेवर परिणाम….

*द्राक्ष बागांमधील पाने करपतात
*सूर्यकिरणांच्या सहाय्याने पानांमधून होणारी अन्न तयार करायची प्रक्रिया थंडीमुुळे मंदवते
*जमिनीतील तापमानात घसरण झाल्याने मुळांची सक्रीयता कमी होऊन अन्न प्रक्रियेवर दुहेरी फटका बसतो.
*मण्यांमध्ये साखर उतरण्याचा कालावधी वाढणार
*फुलो-यातून बाहेर पडून पाच मिलिमीटर आकाराच्या तयार झालेल्या मण्यांचा आकार दोन मिलिमीटर होण्याचा कालावधी तीन दिवसांवरून सहा दिवसांपर्यंत जातो
*छाटणीनंतर 120 दिवसांनी द्राक्षाची होणारी काढणी 130 ते 145 दिवसांपर्यंत जाणार