संस्कार इंग्लीश मेडीयम स्कुल, लासलगांवचे घवघवीत यश

देवगाव गट/प्रतिनिधी/बाबा गिते

परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय नववी ज्युनियर अजिंक्यपद व निवड चाचणी ड्रॉप रो बॉल स्पर्धेत लासलगांव येथील संस्कार इंग्लिश मिडियम स्कुलचा विद्यार्थी ओमकार संतोष शिंदे याने सुवर्णपदक प्राप्त केले.

या स्पर्धेसाठी १४ वर्षाखालील शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला होता. त्यात नाशिक ग्रामीण संघासाठी ओमकार शिंदे यांसह इतर खेळाडुंनी भरीव कामगिरी करुन सुवर्ण पदक मिळवुन संघाला विजयी केले. यशस्वी खेडाळूंचे ऑल इंडिया ड्रॉप रो बॉल असोशियशन उपाध्यक्ष दत्तागिरी गोसावी राज्य ड्रॉप रो बॉल असोशिएशनचे उपाध्यक्ष दत्तागिरी गोसावी, राज्य ड्रॉप रो बॉल असोशिएशनचे अध्यक्ष शैलेश सोनजे सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले. तसेच खेळाडूस मुख्याध्यापिका आश्वीनी कुशारे प्रशिक्षक सौ.अनिता पवार, साजिद सैय्यद, विलास गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभते.