टाकवडे गावातील अतिक्रमणाला ग्रामपंचायत व राजकीय आशिर्वाद

बाळकडू वृत्तसेवा-कोल्हापुर जिल्हा
शिरोळ ( टाकवडे)दि.१४/०५/२०१९
        टाकवडे गावातील सार्वजनिक रस्ता अतिक्रमणाला राजकीय आशीर्वाद असल्याने ग्रामपंचायत अतिक्रमण काढीत नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.
       टाकवडे ता. शिरोळ येथील सिटी.सर्वे.नंबर ३५ व १९६ चे पश्चिमेस व सि.स.नं. ३६, ३७, ३८, ३९ व सि.स. नं. १९५ चे पुर्वेस असणारा उत्तर दक्षिण चालीचा सुमारे ८ फुट रूंदीचा रस्ता, सदरचा रस्ता हा तसाच अगदी दक्षिणेकडे सि.स.नं. १९५ च्या दक्षिणेपासून व सि.स.नं. १९९ व २०० च्या पश्चिमेकडे उत्तर दक्षिण चालीचा रस्ता होय.
       सदरच्या नकाशात नोंद असलेल्या रस्त्यावर लोकांनी अतिक्रमण केलेले असून ते अतिक्रमण काढून टाकून रस्ता खुला करणेत येणेबाबत. वर विषयात नमुद केलेला रस्ता हा कायमस्वरूपी रस्ता असून त्याची नकाशा सदरी रस्ता म्हणून नोंद ही आहे. नकाशात दाखविलेला ‘ अ ‘ ब ” पासून ते ‘ क ’ ‘ ड ‘ पर्यंतचा रस्ता हा रस्ता आहे .
          सदरच्या या रस्त्यापासून अनेक लोक ये-जा करत असतात. वहीवाट करत असतात. तथापी काही लोकांनी सदर रस्त्यावर अतिक्रमण केलेले आहे. त्यामुळे सदरचा रस्ता हा बंद झालेला आहे. याबाबत  वेळोवेळी लोकशाही दिनात तसेच ग्रामपंचायतीकडे तक्रार अर्ज दिलेले होते. मात्र अतिक्रमण काढणेची संपूर्ण जबाबदारी ग्रामपंचायतीची असूनही ग्रामपंचायत टाकवडे व ग्रामसेवक यांनी “ सदर रस्त्याचे लगतचे खातेदारांनी आपल्या क्षेत्राची मोजणी करून हदद् निश्चित करून घ्यावी व त्यानंतर कार्यवाही करू,” असे जुजबी व वेळकाढूपणाचे उत्तर करून विश्वामित्राचा पवित्रा घेतला आहे.
        वास्तविक सदर मिळकतींमध्ये नैसर्गिक आपत्ती घडलेस अथवा दुर्घटना घडलेस जाणे – येणे साठी रस्ताच नाही. किंबहूना दैनंदिन व्यवहारासाठी जाणे – येणे करीता रस्ता बंद आहे. रस्त्यावरील अतिक्रमण काढणे करीता मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधील कलम ५३ व प्रचलित परिपत्रका नुसार रस्त्यावरील अतिक्रमण काढणेचा अधिकार फक्त ग्रामपंचायतीचा आहे. आणि त्या रस्त्यावर अतिक्रमण झालेस रस्त्याची मोजणी करावयाची झालेस ती मोजणी करणेचा ही अधिकार ग्रामपंचायतीस आहे. अतिक्रमण करणारे लोक हे आपली हदद् निश्चित करणेसाठी कधीच मोजणी करणार नाहीत. त्यामुळे तोपर्यंत रस्ता बंद करावयाचा का? याचाही विचार ग्रामसेवक टाकवडे यांनी केला नाही. त्यामुळे आवश्यकता वाटलेस ग्रामपंचायतीने स्वतः रस्त्याची मोजणी करणे आवश्यक आहे. मात्र तशी अतिक्रमणाची बाब ग्रामपंचायतीच्या निदर्शनास आणून देवून ही राजकीय दबावाने ग्रामसेवक यांनी वेळकाढूपणा करत आहेत. रस्त्याची मोजणी आपण न करता अतिक्रमण केलेल्या लोकांनाच मोजणी करावयास सांगत आहेत. कि जेणेकरून ती लोक मोजणीच करू नयेत .
         अशाप्रकारे ग्रामसेवक टाकवडे व ग्रामपंचायत टाकवडे हे आपल्या कर्तव्यात कसूर करून दप्तर दिरंगाई करत आहेत व अतिक्रमण करणारे लोकांना मदत करत आहेत. सदरचा रस्ता हा सार्वजनिक असून सदर रस्त्यावरील अतिक्रमण काढणे हे कर्तव्य असताना ग्रामपंचायत आपल्या कर्तव्यात कसूर करत आहे. अशी माहिती ग्रामस्थ देत आहेत.
बाळकडू पत्रकार-विनायक कदम
शिरोळ तालुका प्रतिनिधी जि.कोल्हापुर
मोबा.९७६२३१५४९१