भव्य त्रिदिनी किर्तन महोत्सव, लासलगांव येथे २५ मे ते २८ मे साडेतीन दिवसांचा भव्य साप्ताह

बाळकडू नेटवर्क/जि.नाशिक

खेडलेझुंगे :- ओम साई गणेश मित्र मंडळ, नंदनगर लासगलांव हे नियमित विविध सामाजिक उपक्रम राबवित असते. उद्या दिनांक २५/०५/२०१९ ते २८/०५/२०१९ दरम्यान साडेतीन दिवसांचा भव्य सप्ताह आयोजित करण्यात आलेला आहे. सप्ताहाचे हे ४ थे वर्ष असुन मार्गदर्शक रामायणाचार्य ह.भ.प.सौ. सुवर्णामाई अनिल महाराज जमधडे, येवला यांचे आहे.

शनिवार दिनांक २५/०५/२०१९ रोजी समाजप्रबोधनकार ह.भ.प.कु. ज्योतीताई जगताप (वाकी), रविवार दिनांक २६/०५/२०१९ रोजी ह.भ.प. विश्वनाथ महाराज कोल्हे (चिखल ओहोळ), सोमवार दिनांक २७/०५/२०१९ रोजी भागवताचार्य-गाणकोकीळा ह.भ.प. कु. साध्वी सोनाली दीदी कर्पे (चकलंबा, गेवराई) यांचे किर्तन होवुन मंगळवार दिनांक २८/०५/२०१८ रोजी भागवताचार्य ह.भ.प.अनिल महाराज जमधडे, येवला यांच्या काल्याच्या किर्तना नंतर दुपारी १२ ते ३ दरम्यान महाप्रसादाने कार्यक्रमाचे सांगता होणार आहे.

तसेच यावर्षीच्या कार्याक्रम दरम्यान जम्मु येथील पुलवामा व गचिरोली येथे नक्षली भुसुरंग स्फोटातच्या भ्याड हल्यात शहीद झालेल्या आपल्या वीर जवानांना भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात येणार आहे.

बाबा गिते, बाळकडू वार्ताहार

9823536834/babagite955@gmail.com