नाशिक , दिंडोरीतील उमेदवारांनी घडवला इतिहास 

बाळकडू वृत्तसेवा , नाशिक जिल्हा
      नाशिक व दिंडोरी या दोन्ही मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत . नाशिक मतदारसंघात शिवसेनेचे हेमंत गोडसे यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार राष्टवादीचे समीर भुजबळ यांचा २ लाख ९२ हजार २०४ मतांनी पराभव केला . तर दिंडोरीच्या भाजपा उमेदवार डॉ. भारती पवार यांनी राष्ट्रवादीच्या धनराज महाले यांचा १ लाख ९८ हजार ७७९ मतांनी पराभव केला .
         यामध्ये नाशिक मतदारसंघात गेल्या ४८ वर्षात झालेल्या  ११ निवडनुकांत प्रथमच सलग दुसऱ्यांदा खासदार होण्याचा बहुमान पटकवलाय . गेल्या ११ निवडणुकांत या मतदारसंघात कुठलाही खासदार रिपीट झालेला नाही . आता हा इतिहास हेमंत गोडसे यांनी सलग दुसऱ्यांदा निवडुन येत बदलून टाकला आहे .
         दिंडोरी मतदारसंघात राष्ट्रवादीने तिकीट नाकारल्याने ऐनवेळी भाजपात प्रवेश करुन राष्ट्रवादीच्याच उमेदवाराचा पराभव करुन लोकसभेत पोहचलेल्या डॉ. भारती पवार या नाशिक जिल्ह्यातील पहिल्याच महिला खासदार ठरल्या आहेत . या मतदारसंघात भाजपाने चौथ्यांदा बाजी मारली आहे .
         या निवडणूकीत नाशिकमध्ये हेमंत गोडसे यांनी एकुण ५ लाख ६३ हजार ५९९ मते मिळवली .  या मतदारसंघात कुठल्याही विजयी उमेदवाराने मिळवलेली ही सर्वाधिक मते असुन हाही एक विक्रम हेमंत गोडसे यांनी केला आहे .
        एकेकाळी मसेचा बालेकिल्ला असलेल्या नाशिकमध्ये मनसे ईफेक्ट होईल असे वाटत होते मात्र  या दोन्ही महायुतीच्या उमेदवारांनी विजयश्री खेचुन आणली असुन भाजपा व शिवसेना या मित्रपक्षांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे .
बाळकडू पत्रकार – दिनेश शिंदे ,
उत्तर महाराष्ट्र विभाग प्रमुख