शिवसेनेचा वाघ प्रतापराव जाधव यांनी बुलढाणा लोकसभेत विजयाची हैट्रिक

बाळकडू/बुलडाणा वृत्त
लोकसभेच्या रणांगनात बुलडाणा येथे प्रतापराव जाधव यांची हैट्रिक पूर्ण..
लोकसभेचे शंख फुकताच बुलडाणा लोसभेचे लाड़के खासदार भूमिपुत्र श्री प्रतापराव जाधव यांना सतत तिसऱ्यांदा शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली आणि त्यानी आपल्या प्रचारची धुमाळी जिल्हाभरात सुरु केलि.
      बुलडाणा लोकसभेसाठी शिवसेनेचे प्रतापराव जाधव राष्ट्रवादी चे डॉ राजेंद्र शिंगने तसेच वंचित बहुजन आघाडी चे बळीराम शिरस्कर असे मुख्य तीन उमेदवार रिंगनात होते, सर्व उमेदवारानी आपापल्या प्रकारे प्रचार केला त्यामधे प्रतापराव जाधव यांच्यासाठी खामगांव येथे माननीय उद्धव साहेब यांची जाहिर सभा झाली तर डॉ शिंगने साठी माननीय शरद पवार यांची बुलडाणा येथे प्रचार सभा झाली आणि शिरस्कर साठी अगोदरच डॉ प्रकाश आंबेडकर यांची प्रचार सभा झालेली होती त्या नंतर  23 एप्रिल ला मतदान पूर्ण झाले तेव्हा पासुन सर्वत्र चर्चा सुरु झाल्या की निवडून कोन येणार, जनतेचे कौल कुनाकडे असणार, सर्व प्रबळ उमेदवार होते त्या मुळे कोन निवडून येईल है नक्की नव्हते तेव्हा बरेच सर्वे आले की एनसीपी चे डॉ शिंगने सट्टा मार्केट मधे निवडून येत आहेत तर कधी प्रतापराव जाधव निवडून येत आहेत असल्या प्रकारे चर्चा सुरु असताना कोणालाही कळले नाही की कोन बाजी मारणार.
  शेवटी शेवटी  सर्वत्र एकच चर्चा सुरु झाली की जो कोण्ही निवडून येणार हे दहा ते पंधरा हजार मतानी नंतर लोकल बातमिपत्र व साम टीवी वर बुलडाणा येथे एनसीपी चे डॉ शिंगने विजयी होणार असे दाखवान्यात आले.
या वेळी स्तानिक युतिच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्याच्या चेहऱ्यावर चिंता दिसू लागली परंतु
    23 में ची सकाळ वेगळीच काही उगवली व मतमोजनी सुरु झाल्यापासुन प्रतापराव जाधव यानी जी लीड घेतली तर जो पर्यन्त शेवटच्या फेरी पूर्ण झाली तो पर्यन्त ते लीड वर राहिले आणि कमी नाही तर 135000 च्या लीड ने विजयाचे शिल्पकार झाले.
   या नंतर आम्ही जनतेशी बोललो तेव्हा जनतेचे असे म्हणणे होते की डॉ शिंगने है सत्तेचे 11 वर्ष मंत्री व 20 वर्ष जवळपास आमदार असताना कुठलेही विकास कामे जिल्ह्यात केले नाही म्हणून जनतेनी त्यांना 2014 मधे ही आणि 2019 मधेहि नाकारले.
   आणि प्रतापराव जाधव निवडून एन्या मागे मुख्य कारण विचारले असता माहित झाले की ते नहेमि जनतेच्या संपर्क मधे राहिलेले लोकप्रतिनिधि आहेत सामन्य माणसाच्या सामान्य गरजा ही त्यानी पूर्ण केलेल्या आहेत.
    बुलडाणा मधे सर्व महायुतिच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी युति धर्म पाळल्या मुळे एवढा मोठा लीड प्रतापराव जाधव यांना मिळाला हे मात्र नक्की
या मधे जळगाव जामोद चे आमदार श्री डॉ संजय कुटे, खामगांव चे आमदार आकाश फुंडकर, आमदार डॉ रामुलकर, आमदार डॉ शशिकांत खेडेकर, शिवसेना,जिल्हाप्रमुख श्री जलिंधर बुधवत उप जिल्हाप्रमुख भाजपा जिल्हाध्यक्ष श्री ध्रुपत राव सावले , भाजपा विधानसभा प्रमुख श्री योगेन्द्रजी गोड़े,श्री संजय गायकवाड़, माजी जिल्हाप्रमुख धीरज लिंगाड़े, डॉ मधुसूदन सावले, नरुभाऊ खेडेकर या सर्वांचा सिंहाचा वाटा होता.
असल्या प्रकारे श्री प्रतापराव जाधव यानी आपल्या विजयाचि हैट्रिक पूर्ण केलि.
बाळकडू
अनुप श्रीवास्तव
9822834485