शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ‘मातोश्री’ निवासस्थानी प्रचंड गर्दी

कलानगर, मुंबई :- शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस राज्यभरात पर्यावरणविषयक आणि सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. आदित्य ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी ‘मातोश्री’ निवासस्थानी प्रचंड गर्दी झाली. लहान बालकांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांच्याच उत्साहाला उधाण आले होते.

आदित्य ठाकरे यांना शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी ‘मातोश्री’ निवासस्थानी सर्वप्रथम शुभेच्छा दिल्या. सोबत दै. ‘सामना’चे मुख्य वितरक बाजीराव दांगट, महापौर विश्वनाथ महाडेश्वर.

शिवसेना नेते डॉ. मनोहर जोशी यांनीही आदित्य ठाकरे यांचे वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन केले.

शिवसेना नेते पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनीही आदित्य ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या. सोबत सिद्धेश आणि योगेश कदम.

शिवसेना नेते राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनीही आदित्य ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या.

संजय सूरे, किरण जोगळेकर, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनीही शुभेच्छा दिल्या.

युवासेनेच्या कल्याण जिल्हा शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी आदित्य ठाकरे यांना शुभेच्छा देतानाच राज्यातील दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी एक लाख रुपयांचा धनादेशही सुपूर्द केला.

दैनिक बाळकडू च्या पत्रकार टीम कडून मुंबई विभाग प्रमुख पंडित मोहिते-पाटील कोकण विभाग प्रतिनिधी नंदू वारुंगसे, उत्तर महाराष्ट्र विभाग प्रतिनिधी दिनेश शिंदे, पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रमुख संदीप गवळी, मराठवाडा विभाग प्रतिनिधी विनोद गोरे, रायगड जिल्हा प्रमुख संग्राम ठाकूर, पुणे प्रमुख किशोर बांदल, अनुश्क्तीनागर प्रतिनिधी आनंद मांडरे यांनी आदित्य ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या.  तसेच दैनिक बाळकडू वृत्तपत्राचे उपस्थित मान्यवरांना  वाटप करण्यात आले.