माई सिंधुताई सपकाळ यांच्या आश्रमात अनाथ मुलांना खाऊ वाटप करून शिवजयंती साजरी. दै.बाळकडू आणि छत्रपती फाउंडेशनचा अनोखा उपक्रम.

बाळकडू : अमोल धडके
मोबा. ९५२७७६०७७४
हडपसर (पुणे) : अनाथांची माई सिंधुताई सपकाळ यांच्या अनाथ आश्रमात आज १९ फेब्रुवारी २०२१ रोजी शिवजयंतीचे औचित साधून अनाथ मुलांना दैनिक बाळकडू आणि छत्रपती फाउंडेशनच्या वतीने खाऊ वाटप करण्यात आले. शिवजयंती निमित्त राज्य दैनिक बाळकडू व छत्रपती फाऊंडेशन च्या माध्यमातून हडपसर मांजरी बु. येथील सिंधूताई सपकाळ यांच्या सन्मती बालनिकेतन अनाथ बालकाश्रमास खाऊ वाटप करण्यात येऊन अनाथ बालकांसमवेत शिवजयंती साजरा करून समाजात एक आदर्श निर्माण केला. तसेच १८ पगड जाती १२ बलुतेदार ६ आलुतेदार यांना एका छत्राखाली आणून छत्रपतींनी स्वराज्याची निर्मिती केली आशा रयतेच्या राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची १९ फेब्रुवारी २०२१ जयंतीनिमित्त हा दिवस आनंदाने अनाथ मुलांसोबत साजरा करण्यात आला .शिवाजी महाराजांचे विचार त्यांची शिकवण या प्रेरणेतून छत्रपती फाउंडेशनची वाटचाल सुरू आहे.
 संस्थेच्या माध्यमातून निराधाराला आधार, बेरोजगारांना मार्गदर्शन, अहिराणी साहित्यिकांना, व्यासपीठ, स्त्रीभृण हत्या, हुंडाविरोधी जनजागृती, वाढदिवस तसेच विवाहातील अनावश्यक खिर्चिक बाबी, अहिराणी गुणवंत विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन आदी सामाजिक उपक्रम या संस्थेच्या माध्यमातून राबवण्यात येत आहेत.
यासाठी सामुदायिक श्रम हे महत्त्वाचे आहे, समाज सेवा हीच ईश्वर सेवा, आपण आपल्या सामाजिक उपक्रमातुन छोटासा खारीचा वाटा आपण उचलू शकतो. यात संस्थेचे पदाधिकारी व संचालक मंडळ कुठेही कमी पडणार नाही असे दैनिक बाळकडू पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रतिनिधी छत्रपती सेना पुणे शहरप्रमुख अमोल धडके, छत्रपती सेना पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष विजय इंदलकर असेही यांनी सांगितले. या खाऊवाटप कार्यक्रमाच्या वेळीस सिंधुताई सपकाळ यांना राज्य दैनिक बाळकडू वृत्तपत्राचे अंक देऊन प्रकाशन करण्यात आले.
यावेळी छत्रपती युवा सेना पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष विजय इंदलकर, राज्य दैनिक बाळकडू पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रतिनिधी, छत्रपती युवा सेना पुणे शहरप्रमुख अमोल धडके, महिला आघाडी पुणे शहराध्यक्ष संगीताताई मांजरेकर, कोथरूड विधानसभा अध्यक्ष गणेश संकपाळ इतर सर्व कार्यकते पदाधिकारी उपस्थित होते.