घर बांधकामासाठी ठेवलेल्या पैशावर चोराचा डल्ला.. लोणी येथील घटना. ५२ हजार लंपास.

घर बांधकामासाठी ठेवलेल्या पैशावर चोराचा डल्ला.. लोणी येथील घटना. ५२ हजार लंपास.
बाळकडू : महादेव उप्पे
मोबा.९४०४६४२४१७
नांदेड :-
बांधकामासाठी ठेवलेल्या पैशावर चोरट्याने डल्ला मारला असून चोरट्याने घरात घुसून रोख 52हजार रुपये घेऊन पसार झाल्याची घटना ता.1मार्च सोमवार रोजी रात्री एक वाजता लोणी येथे घडली आहे..
        लोणी येथील नामदेव किशनराव बाच्चीपल्ले यांनी  घर बांधकाम साठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी ठेवलेले  रक्कम चोरट्याने डल्ला मारला असून, (ता.01)सोमवार रोजी रात्री सर्वजण झोपले असता रात्री एक वाजता चोरट्याने घरात घुसून कपाटातील 500 च्या 104 नोटा असे एकूण रोख 52 हजार रुपयाची चोरी करून पसार झाला आहे..घरातील कापटाचा आवाज येत असल्याने नामदेव यांनी कोण आहे असे आवाज दिले असता चोरटा रक्कम घेऊन पळून जात होता परंतु हिमतीने नामदेव यांनी  चोरास धरण्याचा प्रयत्न केले असता चोरटा हिसका मारून पळून गेला व हा चोरटा कोण आहे हे नामदेव यांच्या लक्षात आले सदरील चोरटा हा इतर कोणीही नसून गावातील गोविंद शेषेराव माने हा होता,नामदेव यांच्या घराचा बांधकाम चालू आहे यानिमित्त बांधकाम करणारे मिस्त्री यांच्या सोबत  गोविंद हा बांधकाम पाहण्यासाठी घरी आला होता यावेळी घरचा सर्व अंदाज घेऊन घरी चोरी झाली असल्याचे तक्रार नामदेव किशनराव बाच्चिपल्ले यांनी मरखेलं ठाणे येथे दिले असून यावरून आरोपी गोविंद शेषेराव माने यांच्या वर मरखेलं ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आले असून पुढील तपास लोणी बीट जमादार गुडमलवार हे करत आहेत.गावात एकाच ठिकाणी राहणाऱ्या लोकाकडून असे चोरीचे प्रकरण होत असल्याने नागरिक वर्गात आश्चर्य व भितीचे वातावरण पसरले आहे सदरील चोरट्यास तात्काळ जेरबंद करावे अशी मागणी गावकरी वर्गाकडून होत आहे..