वानवडी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी, वाहन चोरी, मोबाईल चोरणारा सराईत आरोपी अटकेत

वानवडी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी, वाहन चोरी, मोबाईल चोरणारा सराईत आरोपी अटकेत
बाळकडू : तुकाराम गोडसे
मोबा.९८५०००९३००
हडपसर (पुणे) :-
 वाहन व मोबाईल चोरी करणाऱ्या एका सराईत आरोपीला वानवडी पोलिसांनी अटक केली आहे. सदर कारवाईमुळे  मोबाईल चोरीचे २ गुन्हे, वाहन चोरीचे २ गुन्हे असे एकूण ४ गुन्हे उघड आले असून १ चारचाकी, १ दुचाकी, ८ मोबाईल असा एकुण ५ लाख ४४ हजार ५०० रुपयांची मालमत्ता हस्तगत करण्यात आली आहे .
    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वानवडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या (गुन्हा रजि . नंबर १३०/२०२१ भा.दं वि .३७९) गुन्ह्याचा तपास सुरू असताना   पोलीस अंमलदार अमित चिन्हे यांना मिळालेल्या गोपनीय बातमीनुसार , चोरीस गेलेली टाटा टियागो कार ही चांडोली फाटा , राजगुरुनगर येथून पुण्याच्या दिशेने येणार आहे, अशी खात्रीशीर बातमी मिळाली. त्यानुसार तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक भोलेनाथ अहिवळे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची २ पथके नेमण्यात करण्यात आली. सदर पथकांनी राजगुरुनगर टोल नाक्यावर सापळा लावला. चोरीस गेलेली कार ही टोल नाक्यावरून पास होवुन ती पुण्याच्या दिशेने जाताना पोलिसांनी गाडीचा पाठलाग करुन त्यास चाकण चौकाचे अलीकडे पोलीस गाडी आडवी लावली. पोलिसांना पाहून त्या गाडीतील चालक हा उतरुन माळरानात पळाला. त्याचा माळरानात पाठलाग केला परंतु तो मिळून आला नाही . तसेच गाडीतील दुसऱ्या इसमास ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव विशाल उर्फ विच्या गोटुराम काळे वय १ ९ वर्षे सध्या रा.पाटील इस्टेट झोपडपट्टी शिवाजीनगर पुणे , मुळ गाव चांडोली फाटा नदीच्या कडेला राजगुरुनगर पुणे असे असल्याचे सांगीतले त्यास ताब्यात घेवुन त्याचेकडे दाखल गुन्ह्याचे अनुषंगाने अधिक तपास केला असता त्या दाखल गुन्हा हा त्याचा साथीदार नामे राजु उर्फ गुड्या मधुकर पवार रा.सदर याच्यासोबत केल्याचे कबूल केले.
       या आरोपीकडून वानवडी पोलीस स्टेशन पुणे शहर , तसेच यवत पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण , मोहोळ पोलीस स्टेशन सोलापुर ग्रामीण , केज पोलीस स्टेशन जिल्हा बीड इत्यादी परिसरात मोबाईल चोरी , वाहन चोरी केलेली असुन मोबाईल चोरीचे ०२ गुन्हे . वाहन चोरीचे ०२ गुन्हे असे एकुण ०४ गुन्हे उघड करुन त्यामध्ये ०१ चारचाकी , ०१ दुचाकी , ०८ मोबाईल असा एकुण ५ लाख ४४ हजार ५०० रुपये किमतीची मालमत्ता हस्तगत करण्यात आलेली आहे .
     सदरची कारवाई अमिताभ गुप्ता सो , पोलीस आयुक्त सो . पुणे शहर , रविंद्र शिसवे साे, सह – पोलीस आयुक्त पुणे शहर , श्री नामदेव चव्हाण सो , अप्पर पोलीस आयुक्त पुर्व विभाग , पुणे शहर , श्री नम्रता पाटील मॅडम , पोलीस उप – आयुक्त परिमडळ ५. पुणे शहर , राजेंद्र गलांडे , सहा . पोलीस आयुक्त वानवडी विभाग , पुणे शहर यांचे सुचनेनुसार पोलीस निरीक्षक दिपक लगड वानवडी पोलीस ठाणे पुणे शहर , श्री . सावळाराम साळगावकर पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) वानवडी पोलीस ठाणे पुणे शहर , यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उप – निरीक्षक भोलेनाथ अहिवळे . सहा.पोलीस फौज.संतोष तानवडे , पो.हवा.राजु रासगे , संतोष नाईक , संजय बागल , विनोद भंडलकर पो.ना.योगेश गायकवाड , संभाजी देविकर . अतुल गायकवाड , पो.शि.नवनाथ खताळ , सुधीर सोनवणे महेश कांबळे , अमित चिव्हे या विशेष पथकाने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *