महाराष्ट्र केसरी आणि राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धे करिता सोयगाव तालुक्यातील दोघांची निवड

महाराष्ट्र केसरी आणि राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धे करिता सोयगाव तालुक्यातील दोघांची निवड……
बाळकडू : विजय काळे
संपर्क.८६००९०३२१३
१०४ सिल्लोड (संभाजीनगर) :- महाराष्ट्र केसरी आणि राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धे करिता कन्नड येथे संभाजीनगर जिल्हा कुस्ती निवड चाचणीत सोयगाव तालुक्यातील वरठाण आणि नायगाव येथील दोघा कुस्तीगीरांचा प्रथम आणि द्वितीय क्रमांकाने निवड झाल्याने सर्व स्तरातून त्याचे अभिनंदन होत आहे.

६५ वी वरीष्ठ राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा ( अधिवेशन ) व महाराष्ट्र केसरी किताब लढत २०२२-२३ कुस्ती स्पर्धे करिता औरंगाबाद जिल्हा (ग्रामीण विभाग) जिल्हास्तरीय कुस्ती निवड चाचणी तालुका क्रीडा संकुल कन्नड येथे रविवारी (ता. २५)औरंगाबाद जिल्हा तालीम संघ आणि कुस्ती मल्लविद्या कन्नड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्पर्धा निवड चाचणीत महाराष्ट्र केसरी गट ( ८६ ते १२५ किलो ) वजनी गटात वरठाण येथील शेख शकिल यांचे प्रथम क्रमांकाने निवड झाली तर नायगाव येथील भाऊसाहेब ढेपले यांची द्वितीय क्रमांकाने निवड झाल्याने . जिल्हा कुस्ती तालीम संघाचे पदाधिकारी डॉ. दत्ताभाऊ पाथ्रीकर, हरिसिंग राजपूत, पर्वत कासुरे, सचिव प्रा नारायणराव शिरसाठ यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.महाराष्ट्र केसरी निवड चाचणीत प्रथमच बनोटी परिसरातील दोघा कुस्तीगीरांचा निवड झाल्याने तालुक्यातील सर्व स्तरातून त्याचे कौतुक करीत त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.