पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष यांना पत्रकार संरक्षण समिती कडून जव्हार तालुक्यातील विविध विकासकामांसाठी निवेदन.

पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष यांना पत्रकार संरक्षण समिती कडून जव्हार तालुक्यातील विविध विकासकामांसाठी निवेदन.
बाळकडू : सुनिल जाबर
संपर्क.९९३०५१७६५८
१२९ विक्रमगड (पालघर) :-

पालघर जिल्ह्यातील सर्व सामान्य जनतेचे पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.प्रकाशजी निकम साहेब यांना दिनांक २६ डिसेंबर २०२२ रोजी पत्रकार संरक्षण समिती पालघर जिल्हा उपाध्यक्ष श्री सोमनाथ टोकरे यांनी जव्हार तालुक्यातील विविध २९ विकास कामाचे निवेदन दिले.तसेच कौलाळे ग्रामपंचायत मधील रस्ते,मोठे पूल यांचे जिल्हा परिषद अध्यक्ष यांना कौलाळे ग्रा. मधील ९ विकास कामाचे निवेदन दिले. तसेच पत्रकार संरक्षण समिती पालघर जिल्हा उपाध्यक्ष श्री सोमनाथ टोकरे बोलताना सांगत होते की.१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत देश स्वतंत्र झाला. परंतु आज जवळजवळ ७५ वर्ष पूर्ण झाली “महात्मा गांधींचा मूलमंत्र लक्षात घेऊनकरावी ” विकास कामे ही खडेपासून सुरुवात केली पाहिजे,तर नक्कीच एक ही खेडापाडा विजेपासून, रस्ते पासून, आरोग्यापासून, वंचित राहणार नाही, आणि भारत देश मोठे दिमाखात स्वतंत्रता अमृत महोत्सव साजरा करत असतो. परंतु पालघर जिल्हा अंतर्गत जव्हार तालुका हॆ पालघर जिल्ह्यामध्ये मिनी महाबळेश्वर थंड हवेचे ठिकाण असून शिवकालीन राजे राजश्री श्रीमंत यशवंतराव मार्तंड राव मुकणे यांच्या काळापासून ऐतिहासिक ओळख आहे. आणि अखंड निसर्गरम्य जंगलात निर्माण केलेला पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुका एकमेव असून या तालुक्यातील बहुतांशी नागरी वस्ती अनुसूचित जमाती (आदिवासी )आहे. परंतु या ऐतिहासिक महत्त्व प्राप्त असलेल्या जव्हार तालुक्यातील गोरगरीब जनता विकासापासून वंचित आहे. आजही विनवाणी जीवन जगत असून शासनाच्या योजना फक्त कागदावर रंगवल्या जात असल्याने या जव्हार तालुक्यातील अनेक मोठे प्रकल्प आरोग्य विषयक, शैक्षणिक विषयक, कृषी विषयक, रोजगार विषयक, दळण वळणच्या सुविधा, पाणीपुरवठ्याच्या योजना, रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे,अशा अनेक गोरगरीब जनतेला जव्हार तालुक्यातील अशा विविध समस्या व संकटांना सामोरे जावं लागतं. म्हणून माझी एकच विनंती आहे की महाराष्ट्र शासनाने योग्य ती उपयोजना करून जव्हार तालुक्यामध्ये विकास कामे करण्यात यावी.व आमच्या जव्हार तालुक्यातील विविध विकास कामे करण्याचा शासनाने मनोदय धरून विकासात्मक विकास कामे विचार करून जव्हार तालुक्यातील गोरगरीब जनतेचे विकास कामे करण्यात यावी. यावेळी उपस्थित मोखाडा पंचायत समिती उपसभापती प्रदीप जी वाघ साहेब, हनुमान माळगावीत माजी ग्रामपंचायत सदस्य कासाटवाडी ग्रामपंचायत , बाळासाहेबांची शिवसेना विक्रमगड तालुका अध्यक्ष श्री सागर आळशी साहेब, मनोज दळवी इत्यादी उपस्थित होते.