शिवव्याख्याते प्राध्यापक श्री. नितीन बानगुडे पाटील यांचे आज शिरसटवाडी (ता. इंदापूर) येथे जाहीर व्याख्यान

बाळकडू वृत्तसेवा  :-

इंदापूर (पुणे) :-

स्वाभिमानी युवा संमेलन अंतर्गत हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त आयोजित शिवसंग्राम व्याख्यानमाला दरवर्षी आयोजित केली जाते. या व्याख्यानमालेचे हे १७ वे वर्ष आहे. आज गुरुवार दि.२६ जानेवारी २०२३ रोजी या व्याख्यानमालेचा तिसरा दिवस असून महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शिवव्याख्याते प्राध्यापक श्री. बानगुडे पाटील यांचे प्रेरणादायी व्याख्यान ऐकण्याची मेजवानी आज रसिक श्रोते प्रेक्षकांना मिळणार आहे.

या व्याख्यान कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंदापूर तालुक्याचे आमदार व माजी राज्यमंत्री श्री. दत्तात्रय मामा भरणे हे असून मोहोळ विधानसभेचे आमदार श्री. यशवंत माने  यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. श्री. मनोहर चौधरी, नीलकंठ मोहिते, अमोल अहिवले हे प्रमुख पाहुणे असतील. तसेच शिरसट वाडी गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामस्थ, तसेच इंदापूर तालुक्यातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित राहणार आहेत.

प्रा. बानगुडे पाटील हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे उपनेते असल्याने सध्याच्या राजकीय परिस्थितिवर ते कोणते भाष्य करतील याकडे देखील पत्रकारांचे लक्ष लागून राहिलेले आहे.

व्याख्यान आज संध्याकाळी ठीक ६:३० वाजता सुरू होणार असून कार्यक्रमाचे संयोजक श्री. नितीन कदम वकील यांनी सर्व श्रोत्यांना व्याख्यानाला येण्याचे आग्रहाचे निमंत्रण केले असून सर्वांनी वेळेत उपस्थित राहून आसनास्थ व्हावे अशी सूचना केली आहे. सर्वानी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा. अशी विनंती केलेली आहे.