हिंदुहृदयसम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर दैनिक बाळकडू चे प्रकाशन व लोकार्पण. मातोश्री निवासस्थानी मा.उद्धवजी ठाकरे व संजय राऊत यांचेकडे दैनिक ‘बाळकडू’ चा शुभारंभ प्रथम अंक सुपूर्द..

हिंदुहृदयसम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर दैनिक बाळकडू चे प्रकाशन व लोकार्पण.
मातोश्री निवासस्थानी मा.उद्धवजी ठाकरे व संजय राऊत यांचेकडे दैनिक ‘बाळकडू’ चा शुभारंभ प्रथम अंक सुपूर्द..
मा.उद्धवजी ठाकरे यांनी दैनिक ‘बाळकडू’ वृत्तपत्रास शुभेच्छा केल्या व्यक्त. बाळकडू पत्रकारांची आस्थेने केली विचारपूस
मुंबई दि.२१:-

हिंदुहृदयसम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे दैनिक ‘बाळकडू’ चे आज धुलीवंदन दि.२१ मार्च २०१९ रोजी शिवतीर्थावर अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत शिवसेनाप्रमुख वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर  प्रकाशन व लोकार्पण करण्यात आले.

तत्पूर्वी,.. मातोश्री निवासस्थानी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या सिंहासनाचे दर्शन घेवून, शिवसेना पक्षप्रमुख मा. उध्दवजी ठाकरे आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्याकडे दैनिक ‘बाळकडू’ वृत्तपत्राचे संपादक व २१ प्रतिनिधी यांनी  दैनिक ‘बाळकडू’ चे प्रथम आवृत्ती शुभारंभाचे अंक सूर्पूद केले. अंक पाहताच त्यांनी ‘बाळकडू’ नावाबद्दल पसंती दर्शविली. त्यांनी ‘बाळकडू’ वृत्तपत्राचे स्वागत करून या चांगल्या कार्यास शुभेच्छा दिल्या. ‘बाळकडू’ च्या उपस्थित प्रतिनिधी ची आस्थेने विचारपूस केली. तसेच आचारसहिंता संपल्यानंतर बाळकडू च्या सर्व पत्रकारांना एकत्रित मोठ्या कार्यक्रमात संबोधित करू असे सांगितले.

गेली तीन वर्ष सन २०१६ पासून ‘बाळकडू’ मासिक वृत्तपत्र चालवत असताना, शिवसेना नेते मा. खासदार संजय राऊत यांचे सहकार्य लाभले. मासिक यशस्वी झाल्यानंतर महाराष्ट्रातील शिवसैनिकांच्या व वाचकांच्या मागणीनुसार ‘बाळकडू’ मासिकाचे दैनिकात रुपांतर करण्यात येत असल्याची माहिती संपादक दिपक खरात यांनी यावेळी उद्धवजी ठाकरे यांना दिली.

यावेळी, “मा. उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आदेशानुसार आणि संजय राऊत यांच्या सर्व सूचनांचे पालन करूनच ‘हिंदुत्व’ हितासाठी आणि शिवसैनिकांच्या कार्यास घरोघरी पोहोचविण्यासाठी बाळकडू अविरतपणे काम करेल” अशी ग्वाही संपादक दिपक खरात दिली.

मा.उद्धवसाहेबांच्या कृपा आशीर्वादाने बाळकडू च्या सर्व पत्रकारांमध्ये नवचैतन्य संचारले. नवा उत्साह निर्माण झाला. याप्रसंगी दैनिक ‘बाळकडू’ चे पत्रकार पंडित मोहिते-पाटील, किशोरकुमार गांधी, जयदिप साळेकर, नंदू वारुंगसे, संदीप गवळी, गोपाल मोकलकर, रविकांत गाडरे, विजय रासकर, दिनेश शिंदे, बाळू राऊत, पोपट जाधव, आनंद मांडरे, बाळासाहेब उघले, आयुब मुजावर, राजेश पवार, ललित आहेर, स्वप्नील सोनवणे, पांडुरंग घुले, विनोद गोरे, महेश दरवडे, निरज गांधी   इत्यादी उपस्थित होते..

मा.उद्धवसाहेबांचे आशीर्वाद घेऊन छाती फुगवून निघालेले बाळकडू चे प्रतिनिधी अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत शिवसेनाप्रमुख वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळावर पोहचले.. तेथे सर्वानी स्मृतीस्थळावर लीन होवून वंदन केले. व साहेबांच्या जयघोषाने वातावरण दुमदुमून सोडले. त्याठिकाणी दैनिक ‘बाळकडू’ शुभारंभाचा प्रथम अंक साहेबांच्या चरणी अर्पण केला. साहेबांच्या स्मृतीस्थळाच्या साक्षीने दैनिक बाळकडू चे लोकार्पण करून प्रकाशन झाले असे जाहीर करण्यात केले.