प्रसिद्धीपत्रक : दैनिक बाळकडू च्या अधिकृत पत्रकारांशिवाय इतरांशी आर्थिक व्यवहार करू नयेत. फसवणूक झाल्यास त्यास वृत्तपत्र जबाबदार राहणार नाही.
दैनिक बाळकडू | दि.१६/५/२०१९
दैनिक बाळकडू च्या अधिकृत पत्रकारांशिवाय इतरांशी आर्थिक व्यवहार करू नयेत. आर्थिक किंवा मानसिक फसवणूक झाल्यास त्यास बाळकडू वृत्तपत्र व संपादक जबाबदार राहणार नाहीत. अशा आशयाचे प्रसिद्धी पत्रक आज सादर करण्यात आलेले आहे.
प्रसिद्धीपत्रक – बोगस पत्रकारांपासून सावधान ! (pdf डाउनलोड करण्यासाठी यावर क्लिक करा.)
“ प्रसिद्धी पत्रक ”
दैनिक बाळकडू या वृत्तपत्राच्या वतीने हे प्रसिद्धी पत्रक सादर केले जात आहे.
दैनिक बाळकडू या वृत्तपत्राचा सध्या कोणीही अधिकृत पत्रकार नाही. तसेच कोणालाही अधिकृत आयकार्ड किंवा नियुक्तीपत्र देण्यात आलेले नाही. दि. १ मे २०१९ पासून त्यापूर्वीच्या सर्व पत्रकार नियुक्त्या व देण्यात आलेली पत्रकार आयकार्ड रद्द करण्यात आलेली आहेत.
यानंतर सर्व पत्रकारांच्या नियुक्त्या नव्याने करण्यात येणार असून त्याची प्रसिद्धी बाळकडू वेबसाईट व दैनिक बाळकडू मधून जाहीरपणे केली जाईल.
दैनिक बाळकडू कडून काही अकार्यक्षम व चुकीच्या प्रवृत्तीच्या पत्रकारांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे असे लोक बाळकडू वृत्तपत्रा विषयी गैरसमज पसरवू शकतात. त्यामुळे अशा लोकांपासून सावध रहावे. अशा लोकांशी बाळकडू पत्रकार या नात्याने कसलेही आर्थिक व्यवहार व भावनिक व्यवहार करू नयेत. अशा बोगस पत्रकारांकडून आर्थिक व मानसिक फसवणूक झाल्यास बाळकडू वृत्तपत्र अथवा संपादक त्यास जबाबदार राहणार नाही.
दैनिक बाळकडू वेबसाईट वर पत्रकाराचे आयकार्ड किंवा नाव असेल तरच तो पत्रकार अधिकृत समजला जावा. www.balkadu.com या वेबसाईट वर पत्रकारांची माहिती पाहायला मिळेल.
श्री.दिपक खरात. संपादक “बाळकडू”
=============================
प्रसिद्धीपत्रक – बोगस पत्रकारांपासून सावधान !(pdf डाउनलोड करण्यासाठी यावर क्लिक करा.)