धक्कादायक..पोलिसच निघाला अट्टल दरोडेखोर!

‌बाळकडू प्रतिनिधी
दि.22 मे

निघोज ( ता. पारनेर) येथील मुख्यबाजारपेठेतील गोडावुन मध्ये दरोडा टाकुन सुमारे सहा लाखाचा माल हस्तगत केल्या प्रकरणी पुणे ग्रामीण जिल्ह्यात कार्यरत असलेला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागात काम करत असलेला एक पोलिसच या दरोड्याचा मुख्य सुत्रधार असल्याचे पारनेर पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. सिसीटीव्ही फुटेजमध्ये हा महाभाग स्पष्ट दिसत असल्याने या पोलिसाच्या अटकेसाठी पारनेर पोलिसांचे पथक रवाना झाले आहेत. दरम्यान पोलिसच अट्टल दरोडेखोर निघाल्याने आता काय कारवाई होणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, निघोज ता. पारनेर येथील मळगंगा मंदिराजवळील एका गोडावुन मध्ये रविवारी पहाटे दरोडा टाकण्यात आला. शटर उचकटुन आरोपींनी आत प्रवेश केला. या गोडावुनमधील सुमारे सहा लाखाचा माल लुटला. या पोलिसाबरोबर आणखी दोघे जण होते.याबाबत पारनेर पोलिस टाण्यात गुन्हा दाखल होताच पारनेरचे पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु करताच गावातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये पुणे ग्रामिण विभागात कार्यरत असलेल्या एका पोलिसांच्या हालचाली आढळून आल्या. पोलिसांनी तपासाची सुत्रे हालवताच हा पोलिसच अट्टल दरोडेखोर निघाल्याचे समोर आले आहे. पारनेर पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असला तरी पोलिसांनी या दरोडेखोर आरोपींच्या अटकेसाठी ठिकठिकाणी पोलिस पथके रवाना केली आहे.
पुणे व नगर जिल्हयांच्या हद्दीवर नगर जिल्हयातील निघोज या गावात रविवार दि १९ पहाटे ही घटना घडली असुन, सी.सी.टीव्ही कॅमेरामधे हे खाकीमधील दरोडेखोर कैद झाल्यांने चोरीचे बिंग फुटले असुन, पोलिस दलांचा इज्जत वाचविण्यासाठी अनेक बडया पोलिस अधिकारी हे प्रकरण मिटविण्यासाठी दोन दिवस प्रयत्न करीत असल्याची चर्चा आहे. आरोपी हा पुणे ग्रामिण ( स्थानिक गुन्हे अन्वेशन ) मधे काम करीत असल्याने शिरूर, दौंड, शिक्रापुर, रांजणगाव गणपती , वाघोळी परीसरातील अनेक दोन नंबर वाल्यांच्या कुंडल्या त्यांना माहीत आहे. अनेक दोन नंबर धंदयात पार्टनर असल्याचे समजते.त्यामुळे परप्रांतीय लोकाना हाताशी धरून डल्ला मारण्यांचा गोरख धंदा त्यांनी मोठया जोरात सुरु केला असुन, त्यामधुन वरिष्ठांची मर्जी राखत लाखोची कमाई दरमहा केली जात असल्याची चर्चा पोलिस दलात रंगली आहे
बाळकडू पातिनीधी
आनंद भुकन
Anandabhukan@gmail.com
pH. 9518957728