पूर्व विदर्भात पाच ठिकाणी भाजप-शिवसेना आणि एक ठिकाणी काँग्रेस ची सत्ता. नागपूर, वर्धा, रामटेक, भंडारा-गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली-चिमूर लोकसभा श्रेत्र

बाळकडू वृत्तपत्र:- पूर्व विदर्भ
दि.२४/०५/२०१९
             पूर्व विदर्भात सहा जिल्ह्यात ११ एप्रिल ला झालेला मतदानाचा कल पाहता जेथील तापमाण अत्याधिक ४२ ते ४७ अंश सेल्शीयस असुन सुद्धा भर उन्हात लोकांनी अापला मतदानाचा हक्क बजावला. पक्षातील उम्मेदवारात रस्सीखेच मजल चालत असतांनी आज येवू घातलेल्या निकालाकडे देशातील नागरीकांचे विशेष लक्ष दिसून आले आहेत. त्यातीलच नागपूर, वर्धा, रामटेक, भंडारा-गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यात भाजप-शिवसेना आणि चंद्रपुर येथे काँग्रेस ची सत्ता आलेली आहे.
               नागपूर लोकसभा येथील भाजप उम्मेदवार श्री. नितिन गडकरी यांना ६४५२४४ आणि काँग्रेस उम्मेदवार नाना पटोले यांना ४३६२७७ असे मत प्राप्त झाली.यात भाजप उम्मेदवार श्री. नितिन गडकरी यांचा २०८९६७ मतांनी विजयी झाले. वर्धा लोकसभा येथील भाजप उम्मेदवार श्री.रामदास तडस यांना ५२८५७८ आणि काँग्रेस उम्मेदवार सौ.चारुलताताई टोकस यांना ३५४०७८ असे मत प्राप्त झाली.यात भाजप उम्मेदवार श्री.रामदास तडस यांचा १७४५०० मतांनी विजयी झाले. भंडारा-गोंदिया लोकसभा येथील भाजप उम्मेदवार श्री. सुनिल मेंढे यांना ६३७११२ आणि राष्ट्रवादी उम्मेदवार नाना पंचबुध्दे यांना ४४२४३१ असे मत प्राप्त झाली.यात भाजप उम्मेदवार श्री. सुनिल मेंढे यांचा १९४६८१ मतांनी विजयी झाले. गडचिरोली-चिमूर लोकसभा येथील भाजप उम्मेदवार श्री. अशोक नेते यांना ५१८१९८ आणि काँग्रेस उम्मेदवार डाँ. नामदेव उसेंडी यांना ४४०९२२ असे मत प्राप्त झाली.यात भाजप उम्मेदवार श्री. अशोक नेते यांचा ७७२७६ मतांनी विजयी झाले. रामटेक येथील शिवसेना उम्मेदवार श्री. कृपाल तूमाने यांना ५५५५०४ आणि काँग्रेस उम्मेदवार किशोर गजभिये यांना ४३९५६१ असे मत प्राप्त झाली. यात शिवसेना उम्मेदवार श्री. कृपाल तूमाने यांचा ११५९४३ मतांनी विजयी झाले व तसेच चंद्रपूर लोकसभा येथील काँग्रेस उम्मेदवार श्री. सुरेश धानोरकर यांना ५४८८१० आणि भाजप उम्मेदवार श्री.हंसराज अहिर यांना ५०३४५५ असे मत प्राप्त झाली. यात काँग्रेस उम्मेदवार श्री. सुरेश धानोरकर  यांचा ४५३५५ मतांनी विजयी झाले.
             पूर्व विदर्भ श्रेत्रात पाच ठिकाणी भाजप-शिवसेना आणि एक ठिकाणी काँग्रेस ची सत्ता मिळवून वरील उम्मेदवारांनी आप-आपला बालेकिल्ला राखला.
__________________________________
श्री. रविकांत सुर्यकांतजी गाडरे
बाळकडू पूर्व विदर्भ विभागिय प्रतिनिधी
९७६४९१३५४५ /९५८८६१७०३४ ravikantgadare1@gmail.com