दिंडोरी लोकसभेच्या उमेदवार डॉ.भारती पवार लाखोच्या मतांनी विजयी. नाशिक जिल्ह्यात पहिल्या महिला खासदार होण्याचा बहुमान

दिंडोरी लोकसभेच्या उमेदवार डॉ.भारती पवार लाखोच्या मतांनी विजयी
कळवण तालुक्याला पहिला मान, जिल्ह्यात पहिल्या महिला खासदार होण्याचा बहुमान

दिंडोरी लोकसभा मतदार संघातील शिवसेना भाजपा उमेदार डॉ.भारती पवार ह्या लाखाच्या मतांनी विजयी झाल्यात स्वातंत्र्योत्तर काळानंतर पहिल्यांदा कळवण तालुक्याला व नासिक जिल्ह्याला पहिला महिला खासदार होण्याचा बहुमान डॉ. भारती पवार यांच्या रुपाने मिळाला आहे.
त्यामुळे कळवण तालुक्यात समर्थकांनी एकच जल्लोष केला.लोकसभेच्या पुर्वसंध्येला बुधवारी (ता.२२) डॉ.भारती पवार उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री सप्तशृंगी देवीचे दर्शन घेतले.तसेच गुरुवारी (ता.२३) मतमोजणीच्या दिवशी जसजशी आघाडी मिळत गेली.व विजयाची खात्री पटताच पुन्हा डाॕ.भारती पवार ह्या श्री सप्तशृंगी देवीच्या चरणी लिन होवुन  नासिक कडे रवाना झाल्या .निकालानंतर कळवण शहरात स्टेट बँक चौक,डाॕ.न्याती चौक, गांधी चौक, फुलामाता चौक, गणेश नगर या भागात आतषबाजी करुन पेढे वाटुन विजयोत्सव साजरा करण्यात आला.
भाजपा तालुकाध्यक्ष सुधाकर पगार ,शिवसेना तालुकाप्रमुख अंबादास जाधव, भाजपा शहराध्यक्ष निंबा पगार, शहरप्रमुख साहेबराव पगार, भाजपा संघटनमंत्री नंदकुमार  खैरनार ,भाजपा प्रदेश कार्य.सदस्य विकास देशमुख, व्यापारी आघाडीचे जिल्ह्याध्यक्ष गोविंद कोठावदे, डाॕ.अनिल महाजन, सतिश पगार ,उपशहरप्रमुख विनोद मालपुरे ,ग्राहक संरक्षण कक्षाचे किशोर पवार ,युवा मोर्चाचे हेंमत रावले ,चेतन निकम, सुरेश निकम ,अंनत नागमोती, रिपब्लिकन पक्षाचे दिलीप निकम, बापु जगताप, राजु पाटील, आदिसह भाजपा व शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते व समर्थक हितचिंतक उपस्थितीत होते.

ललित आहेर
कळवण ता.प्रतिनिधी
नासिक जिल्हा
९६५७४६०००९